Home देशविदेश संविधान विरोध म्हणजे राष्ट्रद्रोहच होय….

संविधान विरोध म्हणजे राष्ट्रद्रोहच होय….

     भारतीय स्वातंत्र्याचा लढा म्हणजे परकीय विरुद्ध स्वकीय यांचा लढा होय.भारतीय स्वातंत्र्याचा लढा म्हणजे स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेले लढाई किंवा स्वातंत्र्यसंग्राम होय. भारतात इंग्रजांचे राज्य जरी असले म्हणजेच सत्तेत परकीय इंग्रज जरी असले तरी या सत्तेच्या सैन्यांमध्ये म्हणजे सैन्य हे भारतीय लोकांचेच होते.म्हणजे सैन्यात भरती ही भारतीय लोकांचीच व्हायची.

          म्हणजेच इंग्रज राजवटीतील सैन्यात भारतीय मुस्लिम आणि भारतीय हिंदू हेच होते,परंतु सैन्याचे मुख्य अधिकारी सरदार हे मात्र इंग्रज होते.म्हणजेच इंग्रज माणूस असायचा.

          इंग्रज सत्तेविरुद्ध जे पहिले बंड झाले 1857 ला हे बंड हे शिपायांचे बंड म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे,हे बंड इंग्रजांच्या सैन्यातील भारतीय सैनिकांची सैनिकांनीच केलेले बंड होय,या बंडापासूनच भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यास सुरुवात झाली. 

          याचवेळी इंग्रजांना कळले की भारतीय जनतेतील काही राजकीय कार्यकर्ते हे सत्तेवर नाराज आहेत आणि ते सत्तेविरुद्ध बंड करणार आहेत,कारण जनतेच्या अनेक आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक समस्या होत्या,त्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय काढणे याशिवाय पर्याय नाही हे इंग्रज सत्तेला कळून चुकले होते.

        म्हणून एका इंग्रज अधिकाऱ्यांनीच काँग्रेस नावाची संघटना स्थापन केली,त्या संघटनेत पितृही किंवा बंड करू इच्छिणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेतले,आणि भारतीय जनतेच्या समस्या काय आहेत हे सांगण्यासाठी किंवा माहिती करून घेण्यासाठी म्हणून या काँग्रेसचा म्हणजे या संघटनेचा उपयोग करून घेणे हा उद्योग इंग्रजांनी सुरू केला.

          काँग्रेस ही एक राष्ट्रीय संघटना होती,यात आजच्या संघटना उदाहरणार्थ आरएसएस, हिंदू महासभा,आर्य समाज,कम्युनिस्ट,समाजवादी,इत्यादी आजच्या राजकीय किंवा सामाजिक संघटनांचे पूर्वीचे प्रमुख या काँग्रेस संघटनेत होते, 

          काही काळानंतर या काँग्रेस संघटनेने एक राजकीय भूमिका घेऊन स्वातंत्र्याचा लढा सुरू केला,त्यावेळी मात्र या संघटनेतच मतभेद सुरू झाले,काँग्रेस मधील काही कार्यकर्त्यांना वाटले की हा स्वातंत्र्याच्या लढा हा इथून इंग्रज गेल्यानंतर भारत हा हिंदू राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला पाहिजे,काही कार्यकर्ते म्हणाले, भारतातून इंग्रज गेल्यानंतर भारत हा समाजवादी देश म्हणून अस्तित्वात आला पाहिजे,काही कार्यकर्ते म्हणाले,भारतातील इंग्रजांची राजवट संपुष्टात आल्यानंतर या देशात साम्यवादी अर्थव्यवस्था स्थापन झाली पाहिजे.

        अर्थात काँग्रेसची दरवर्षी अधिवेशने व्हायची,त्यात ही चर्चा व्हायची,आणि बहुमताने निर्णय व्हायचे,आणि बहुमताला ज्यांचे विचार मान्य नाहीत असे लोक काँग्रेसच्या बाहेर पडायचे,त्यापैकीच काही कार्यकर्ते म्हणजे आजच्या हिंदू महासभा आणि आरएसएसची संस्थापक आहेत. 

          काँग्रेसचा लढा हा परकीय यांच्या विरोधात जरी असला तरी,तो धर्मनिरपेक्षता,समाजवाद,लोकशाहीर यासाठीच आहे हे त्यांना पक्के समजले होते,म्हणून ते काँग्रेस संघटनेच्या बाहेर पडले,कारण त्यांना समाजवादी अर्थव्यवस्था,धर्मनिरपेक्ष सामाजिक व्यवस्था,आणि लोकशाही मान्य नव्हती.

         तर धर्मावर आधारित हिंदू मुस्लिम अशी दोन रात्र म्हणजे राष्ट्राचे विभाजन त्यांना मान्य होते.यास जीनाची पण सहमती होती.याचा अर्थ मुस्लिम नेते जिना आणि हिंदू नेते हेडगेवार सावरकर या दोघांची मत एकच होते.

        ते म्हणजे भारताची फाळणी करणे,एका राष्ट्राचे द्विराष्ट्र बनविणे.कम्युनिस्ट समाजवादी आणि लोकशाहीवादी धर्मनिरपेक्षवादी गांधी नेहरू पटेल यांना यांची ही भूमिका मान्य नव्हती. 

        परंतु प्रत्येक अधिवेशनात याच विचाराचे बहुमता असायचे आणि नेतृत्व हे याच विचारांच्या लोकाकडे गेले विशेषता गांधी,नेहरू,पटेल यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व राहिले तेही बहुमताने.कम्युनिस्ट आणि समाजवादी विचाराचे लोक यांच्यासोबत राहिले आणि स्वातंत्र्याची लढाई केली.मात्र नेतृत्व हे गांधी,नेहरू,पटेल यांच्याकडेच स्वातंत्र्योत्तर काळात पण राहिले,त्यामुळे स्वातंत्र्याचा लढा हा काँग्रेसने लढला आणि जिंकला अशी आम भारतीयांची समज झाल्यामुळे आणि तेही खरेच असल्यामुळे १९५२ ला जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली त्यात जनतेने काँग्रेस या पक्षालाच बहुमताने निवडून दिले आणि हीच परंपरा पुढे चालू राहिली.

        अर्थात संविधानात या सर्वच लोकांचा विचार करण्यात आला म्हणजे संविधानाचा मूळ पाया हा स्वातंत्र्य होता,म्हणून विचार स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कार्य स्वातंत्र्य याला महत्त्व देण्यात आले.

         विरोधी पक्ष तयार करण्यात आला,बहुपक्षीय संविधान बनविण्यात आले,संविधानकर्त्यांनी म्हणजे बाबासाहेबांनी भारतीय परिस्थिती आणि संस्कृती आणि भारतीय लोकांचे विविध विचार हे लक्षात घेऊन आणि सगळ्यांनाच हे संविधान म्हणजे आपल्याला संधी देणारे संविधान आहे,आपल्या विचाराला संधी देणारे संविधान आहे,या संविधानात विचार स्वातंत्र्याला महत्त्व दिलेले आहे,अशी लोकांची धारणा होईल आणि याच पद्धतीमुळे राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकून राहील, म्हणजेच विविधतेत एकता,हे सूत्र समोर ठेवून म्हणजेच व्यापक विचारातून बाबासाहेबांनी हे संविधान साकारले.

         परंतु विचार स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कृती स्वातंत्र्य याचा गैरफायदा घेऊन संविधानाची जी मूलतत्त्वे आहेत किंवा संविधानाची उद्देशिका आहे त्यावरच घाव घालण्याचे काम सुरू झाले,एवढेच नव्हे तर,हे राष्ट्र जर हिंदू राष्ट्र म्हणून आले नाही तर आम्हाला हे स्वातंत्र्य मान्य नाही,हे संविधान मान्य नाही,आणि हीच काँग्रेसची सत्ता पण मान्य नाही,असे जाहीरपणे प्रचार प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आरएसएस आणि हिंदू महासभा ला मिळाले.

      म्हणून त्यांनी गेल्या 90 वर्षात बरोबर व्युह रचना,षडयंत्र केले,त्यांना माहित आहे की,या देशातील जनता ही देव भोळी आहे,धर्मांध आहे,साधी भोळी आहे,अडाणी आणि अज्ञानी आहे,अशिक्षित आहे,गरिबीमुळे परावलंबी आणि लाचार आहे,या गोष्टीचा फायदा यांनी उठविला.

         आर.एस.एस.च्या अनेक शाखा काढल्या,आर्थिक,सामाजिक,राजकीय,धार्मिक,सांस्कृतिक सगळ्यात क्षेत्रामध्ये शाखा स्थापन केल्या.शिक्षण,आरोग्य,कोर्ट कारखाने,शेती अशा अनेक उद्योगांमध्ये पण औद्योगिक शाखा सुरू केल्या,जवळजवळ दीडशे शाखा सुरू केल्या,आणि आरएसएसचे जाळे पसरविले.

         अनेक आश्रम शाळा काढल्या,अनेक लोकांनी अविवाहित राहून,हिंदू राष्ट्राचे स्वप्न जनतेपुढे मांडत राहिले,आणि हे संविधान कसे कुचकामी आहे,हे जनतेस पटवीत राहिले.

         तसेच आपल्या विचाराचे लोक जोपर्यंत सत्तेत जाणार नाहीत आणि सत्ता जोपर्यंत आपल्या हाती येणार नाही तोपर्यंत आपल्याला हे संविधान बदलणे अशक्य आहे,यासाठी एन केन प्रकारे कोणत्याही मार्गाने,कोणत्याही चांगल्या वाईट मार्गाने सत्यता आले पाहिजे असा प्रण म्हणजे प्रतिज्ञा यांनी केली आणि यात ते यशस्वी झाले. 

         या देशातील स्वर्गीय व्यवस्था म्हणजे आर्थिक विषमता,जातीय व्यवस्था म्हणजे सामाजिक विषमता,धर्मा भिमान आणि धर्मांधता,कर्मकांड, अंधश्रद्धा,देव,मंदिरे यांचा उपयोग करून म्हणजेच या शस्त्रांचा वापर करून शेवटी त्यांनी सत्ता हस्तगत केली, 

          सत्ता हाती आली म्हणजेच या देशाची मिल्ट्री,पोलीस,नोकरशाही त्यांच्या मुठीत आली त्यामुळे जुलूम जबरदस्ती साठी यांचा वापर सुरू झाला,आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे विरोधक बोलतील त्यांना म्हणजे जवळजवळ दीडशे खासदारांना एकदाच संसदेतून निलंबित करण्याची हुकूमशाही सुरू केली.

         न्यायालय,रिझर्व बॅंक,सीआयडी,इडी,निवडणूक आयोग अशा म्हणजे लोकशाही टिकविणाऱ्या स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करून या संस्थांना ताब्यात घेतले आणि अनेक प्रकारचे षडयंत्र करून सत्ता टिकविण्यातचे केविलवाणी प्रयत्न चालू आहेत. 

          सगळ्यात यांचा मोठा प्रचार म्हणजे हे संविधानच कुचकामी आहे.कारण या संविधानामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने हिंदू राष्ट्र स्थापन होणे शक्य नाही,त्यासाठी हुकूमशाहीचीच आवश्यकता आहे,असा पण प्रचार आता सुरू झालेला आहे.

          कारण त्यांना माहित आहे की,मतदानात या मार्गाने गेलो तर या देशात एससी,एसटी,ओबीसी,अल्पसंख्यांक या सर्व मागास जातींची संख्या 85 टक्के आहे,म्हणजे यांचीच बहुमत आहे,यांचे मत आपणास मिळणे शक्य नाही,यासाठी ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून,किंवा मतदान याद्यांमध्ये घोटाळा करून निवडून येण्याचे आजपर्यंत केविलवाणे प्रयत्न झाले.

         यामुळे बहुजन समाजाची सत्ता कधीच आली नाही,आणि या पद्धतीने येणार पण नाही,याची जागृती बहुजन समाजाचे कार्यकर्ते पण आता करीत आहेत,हे जनतेला पण पटायला लागलेले आहे,यामुळे आता लोकशाहीचा मार्ग काही उपयोगाचा नाही,आपणास सत्तेत राहायचे असेल तर,आता हुकूमशाही शिवाय पर्याय नाही,इथपर्यंतची तयारी झालेली आहे. 

        हुकूमशहाच्या ताब्यात मिलिटरी,पोलीस आणि प्रशासन असते.त्यामुळे हुकूमशाही पुढे जनतेचे काही चालत नाही,मतदान हा मार्ग तर कुचकामीच ठरतो. 

      भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा बहुजनांनीच लढला,त्याचे नेतृत्व मात्र अभिजनाकडे होते,हे पण आता बहुजनांना समजायला लागले आहे,म्हणून आता बहुजनांचे नेतृत्व हे बहुजनांच्याच लोकांकडे असले पाहिजे यासाठी क्रांती मोर्चा सुरू झालेले आहेत,लोक यासाठी रस्त्यावर उतरत आहेत,निदर्शने मोर्चे उपोषण धरणे इत्यादी आंदोलने संपूर्ण भारतभर चालू आहेत,अर्थात हेही पण धर्मवादी आणि धर्म आधारित राष्ट्र असावेत अशा विचारसरणीच्या लोकांची झोप उडालेली आहे.

        भारतीय संविधान हे अत्यंत हुद्दार,व्यापक आणि सर्वसमावेशक आहे.तरी याचा गैरफायदा संकुचित विचाराचे लोक घेत आहेत,एवढा फायदा घेत आहेत की,हे संविधान कूचकामी आहे.

        हिंदू राष्ट्र निर्माण करण्यात संविधान हा एक फार मोठा अडथळा आहे,असे लोकांना समजून सांगण्याचा मोठा प्रयत्न चाललेला आहे,कारण लोकांना राष्ट्रापेक्षाही देव आणि धर्म प्रिय आहेत.

        याचा फायदा घेऊन आपण हुकूमशाही प्रस्थापित करून सत्तेतच कसे काय राहता येईल,हिंदुराष्ट्र हे समोर ठेवून परत ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,यांचेच वर्चस्व कसे राहील आणि शूद्र म्हणजे ओबीसी,एसटी आणि अतिशय म्हणजे अस्पृश्य जाती जमाती आणि स्त्रिया यांना कसे गुलाम करता येईल,म्हणजे स्वातंत्र्य,समता,बंधुभाव,न्याय या तत्त्वाचे पालन करणारी ही राज्यघटना मोडून परत विषमता आधारित मनुस्मृती कशी लागू करता येईल यासाठीचे षडयंत्र अजूनही चालूच आहे.

         म्हणून सत्तेला विरोध करणे म्हणजे विकासाला विरोध करणे होय,तसेच सत्ताधाऱ्यांना विरोध करणे म्हणजे राष्ट्राला विरोध करणे होय,म्हणजेच हा राष्ट्रद्रोह होय.अशा प्रकारचा प्रचार-प्रसार करणे चालू आहे.

          परंतु खरे तर समतेचा पुरस्कार करणारी राज्यघटना हे मोडीत काढणे आणि त्यासाठी दुष्ट प्रचार करणे म्हणजेच राष्ट्रद्रोह होय.हेही तितक्याच ठामपणे बहुजनांनी सांगितले पाहिजे.

       कारण कोणतेही राष्ट्र हे त्या राष्ट्राच्या संविधानानुसार चालत असते,कोणत्याही देशाच्या सुप्रीम कोर्टाचे काम हे त्या देशाच्या संविधानाचे संरक्षण करणे हेच असते,संविधानाचे संरक्षण करणाऱ्या न्यायव्यवस्थेच्या प्रमुख न्यायाधीशालाच जर बूट फेकून मारण्याची हिंमत होते हे केवळ सत्तेच्या पाठिंबामुळेच.

         बाबासाहेबांनी संविधान लिहिले नाही,बाबासाहेब गंधा आदमी है,उसको मिटा दो,बाबासाहेबांचे पुतळे पाडले पाहिजेत अशा प्रकारचे उघडपणे मीडियावर बोलने,आणि अशावर केस नोंदवली असतानाही त्यास अटक न होणे,किंवा अशा लोकांना सत्ताधाऱ्यांनी तंबी न देता गप राहणे किंवा अशांना पाठिंबा देणे म्हणजेच संविधानाचा अपमान आहे,संविधान अमान्य करणे आहे,असे लोक हेच खरे राष्ट्रद्रोही आहेत. 

        ज्या संविधानानुसार सत्ता,प्रशासन,मिलिटरी,पोलीस, कायदे,न्यायालय आणि स्वायत्त शासकीय संस्था चालायला पाहिजेत,त्याच जर चालत नसतील,त्या केवळ पंतप्रधानांच्या इशारावरच चालणार असतील तर ही एक प्रकारची हुकूमशाहीच आहे जी संविधान विरोधी आहे.

       म्हणून आजची ही भाजपची सत्ता म्हणजे आर.एस.एस.ची सत्ता आहे,जी आर.एस.एस.विषमतावादी विचाराची आहे,बहुजनांच्या विरोधातले आहे.संविधान न मानणाऱ्या किंवा संविधानाचा अपमान करणाऱ्या किंवा हे संविधान मोडीत काढून आम्हाला या ठिकाणी मनुस्मृति परत आणायचे आहे,आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे,आम्हाला लोकशाही नको आम्हाला हुकुमशाही हवी आहे,असे जाहीरपणे चर्चा करणारे,भाषण देणारे आणि कृती करणारे लोक आज राजरोसपणे वावरताना दिसत आहेत.

       आणि संविधानाच्या,लोकशाहीच्या, धर्मनिरपेक्षतेच्या आणि समाजवादाच्या बाजूने प्रचार प्रसार करणाऱ्या,भाषणे देणाऱ्या लोकांवर बंधने येत आहेत,त्यांना राष्ट्रद्रोही समजून किंवा अर्बन नक्षल वादी समजून त्यांच्यावर केसेस करणे,त्यांना जेलमध्ये टाकने असे प्रकार राजरोसपणे भाजपाच्या या राज्यात सुरू झालेले आहेत.असे प्रकार करणे किंवा घडून आणणे म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोहच होय. 

         हा विचार या देशातील देव भोळ्या,धर्म भोळ्या सर्वसामान्य जनतेला समजून सांगणे ही काळाची गरज आहे. 

       लेखक :- दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक :- 28 ऑक्टोबर 2025. फोन: 94 20 91 2209.