Home Political सेंदूरवाफा-साकोली नगरपरिषदेत परत महिला राज! — उच्चशिक्षित महिला बघायला मिळणार,”सार्वत्रिक निवडणूक...

सेंदूरवाफा-साकोली नगरपरिषदेत परत महिला राज! — उच्चशिक्षित महिला बघायला मिळणार,”सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत नगराध्यक्ष पदाच्या सर्यतीत!  — शिवसेनेत अद्यापही सस्पेन्स?, निवडणूक लढवणार उच्च शिक्षित अनुभवी महिला?

 निलय झोडे 

  उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

साकोली : नगरपरिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत पुरूषांना नगराध्यक्षपद मिळेल या अपेक्षेने बरेच पुरुष निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते.पुरुषांकडे नगराध्यक्षपदाचे आरक्षण येणार या आनंदात सर्व धनाढ्यांसह,करोडपती,”बाशिंग बांधून,सजले होते.

        पण आरक्षण सोडती नुसार परत एकदा सेंदूरवाफा-साकोली नगर परिषदेच्या महिलाच नगाराध्यक्ष होणार असल्याने,नगराध्यक्ष पदांसाठी इच्छुक असलेल्या पुरुष मंडळींचा हिरमोड झाला आहे.यामुळे महिला प्रमुखांना योग्य शासन करण्याची अमुल्य संधी परत एकदा मिळाली आहे.

               सन २०१७ ला साकोली सेंदूरवाफा येथे नगरपरिषदेची पहिले लग्न संपन्न झाले व गेल्या ५ वर्षीय “सत्यानाशी” संसारात कुणाचे काय उद्ध्वस्त झाले हे सुजाण नागरिकांनाच माहिती आहे.

        आता परत चित्र पालटले आहे.तर पुन्हा नगरपरिषद नगराध्यक्षासाठी,”महिला सर्वसाधारण आरक्षण आल्याने उच्च शिक्षित पदवीधर अनुभवी महिला या रिंगणात उतरलेल्या आहेत. 

         मुख्य म्हणजे या दुसऱ्या पंचवार्षिकची सुरुवातीला व येथील त्रस्त जनतेला यंदा उच्च शिक्षित कॉलीफाईड व पदवीधर महिला नगराध्यक्षांच्या रूपात मिळणार आहे हे विशेष.

        जनतेत आता उत्सुकता आहे की,नगराध्यक्ष पदांसाठींच्या महिला उच्च शिक्षित आल्याने आता पारदर्शक व स्वच्छ,गतिमान विकास शक्य होणार असल्याच्या प्रतिक्रिया “साकोली सोशल मिडीया” मध्ये जनतेद्वारे उमटू लागल्या आहेत.

        मागील पंचवार्षिक काळात जनतेसोबत “विकास कामाबाबत” धोकाधाडी करण्याचे काम करण्यात आले होते.यावर्षीच्या नगराध्यक्ष पदाच्या महीला उमेदवार पारदर्शक व भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या आणि उच्च शिक्षित असल्याने मतदारांचा कौल त्यांच्याकडे असन्याची दाट शक्यता आहे.तद्वतच निष्कलंक व चारित्र्यसंपन्न असलेल्या जबाबदार महिलेला नगराध्यक्षपदी निवडून देणार अशी जोरदार चर्चा शहरातील सर्व सुशिक्षित जनतेत सुरू झाली आहे. 

            आजच्या तारखेत साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ मध्ये भाजपाकडून माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांच्या सुन आणि एमए,बीएड,पीएचडी तथा प्रभारी प्राचार्या देवश्री मनिष कापगते यांचे नाव टॉप वर येत आहे. 

       तर माजी पंचायत समिती उपसभापती व राजकीय दांडगा अनुभव असलेल्या तथा महिला नेतृत्व वैजयंती सतिश कापगते यांचे सुद्धा नाव पुढे आले आहे.

         कॉंग्रेस पक्षातर्फे महिला क्षेत्रातील रणरागिणी,बी कॉम,बीपीएड अश्या उच्च शिक्षित सुचिता संजय आगाशे यांचे नाव चर्चेत आहे.तर दुसरीकडे माजी जि.प.सदस्या व राजकीय अनुभवी सुनिता अशोक कापगते यांचे नाव पुढे आले आहे.

        राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प. ) मधून महिला बचत गट बॅंकींग क्षेत्रातील विदर्भ निधी अर्बन बँकेच्या प्रभारी प्रिती प्रविण भांडारकर यांची जोरदार चर्चा सुरू आहे.यातच एनसीपी विधानसभा अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांच्या पत्नी वैशाली वाडीभस्मे व राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा जया नरेश भुरे यांनी सुद्धा जनचर्चेत आघाडी घेतली आहे.

        तर शिवसेना ( उबाठा ) वतीने वरीष्ठ महिला शिवसैनिक व सर्वांच्या सुपरिचित महिला नेत्या प्रतिभा अशोक पारधी यांच्या नावाचा भगवा झेंडा शिवसैनिकांनी उचलून धरला आहे. 

       वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार डी.जी.रंगारी यांच्या पत्नी विद्या रंगारी यांची उमेदवारी पक्की होणार असल्याची माहिती आहे आणि बीएसपी तर्फे महिला बालविकास प्रणेत्या सेवानिवृत्त सेविका वंदना गोपिचंद गजभिये यांचे नाव जनचर्चेत आघाडीवर आहे. 

        आता यात शिवसेना ( शिंदे ) पक्षांकडून कोण दोन महिला नगराध्यक्षा उमेदवार राहतील हे अद्यापही सस्पेन्सच आहे.कारण जे दोन चेहरे समोर येतील त्याने येथील जनतेला आश्चर्याचा धक्का लागणार आहे,असे नुकतेच दूरध्वनीवरून शिवसेना पदाधिकारींनी सांगितले आहे. 

       विशेष म्हणजे ही दूसरी पंचवार्षिक नगरपरिषद निवडणूकी अंतर्गत फार अटीतटीची लढत होणार असून यावेळी मात्र उच्चशिक्षित,पदवीधर महिला नगराध्यक्षा जनतेला प्राप्त होणार आहेत. 

          पारदर्शक विकास हा यावेळी साध्य होणार अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.परंतू जुन्या निष्क्रिय नगरसेविका व नगरसेवकांचे मतदार या नगरपरिषदेच्या निवडणुकीत विसर्जन करणार काय?हा खरा प्रश्न आहे.