Home Maharashtra चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता…. — जिल्हा परिषद उच्च...

चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता…. — जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहिरगावसह इतर शाळांना केव्हा मिळणार शिक्षक? — शालेय शिक्षण विभागाचे उदासीन धोरण का?

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

       चिमूर तालुक्यातील ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेचे दिवाळे काढण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जा खालावण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांना शिक्षक जाणिवपूर्वक दिले जात नाही काय?असा प्रश्न ग्रामीण भागातील पालकांना व नागरिकांना पडला आहे.

        जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी,अशी मागणी चिमूर तालुक्यातील ग्रामीण नागरिक करीत आहे.

               शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे भयंकर शैक्षणिक नुकसान होत आहे आणि शाळांमधील शैक्षणिक व्यवस्था कोलमडत असल्याचे चित्र आहे.

           यामुळे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने तातडीने रिक्त पदे भरावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

          शिक्षकांच्या कमतरतेमुळे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि अनेक जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी दोन तीन शिक्षक हे अनेक वर्गांना शिकवण्याची जबाबदारी पेलत आहे.शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांमध्ये चिंता पसरली असून शालेय शिक्षण विभागाबाबत त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.

         विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया राबवून चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदे भरावे अशी रास्त मागणी नागरिकांची व पालकांची आहे.

       मात्र,महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग ग्रामीण भागातील योग्य व उत्तम शैक्षणिक दर्जाबाबत अनुकूल आहे काय?हा प्रश्न आहे.

         कारण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये असलेली शिक्षकांची कमतरता हे शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणाचा भाग दिसतो आहे.