भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच ग्रामीण भागात आतापासूनच निवडणुकीचे तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. चातगाव – कारवाफा जिल्हा परिषद क्षेत्राकरिता अनुसूचित जमाती (सर्वसाधारण )करिता आरक्षण जाहीर झाल्याने अनेक पक्षाचे कार्यकर्ते उमेदवाराच्या शोधात असल्याचे चित्र आहे.
चातगाव – कारवाफा जिल्हा परिषद मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोरेटी यांची जिल्हा परिषद करिता उमेदवारी जोरदार चर्चेत आली आहे. परसवाडी येथील रहिवासी असलेले अविनाश पोरेटी हे सामाजिक कार्यात सक्रिय असून चातगाव-कारवाफा परिसरात त्यांची चांगली ओळख असून मतदारात परिचयाचे असल्याने याचा त्यांना फायदा नक्की होईल असे बोलले जात आहे
नुकत्याच पार पडलेल्या काही स्थानिक बैठकींमध्ये त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून जनतेच्या मनात असलेला विश्वास स्पष्ट दिसून येतो. अनेक गावातील ग्रामसभा युवक / युवती व पुरुष आणि महिला वर्गाने त्यांना खुले पाठबळ जाहीर केले आहे.
राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. त्यांची उमेदवारी गंभीरपणे घेतली जात असून, स्थानिक पातळीवर नवा पर्याय म्हणून युवा नेतृत्व म्हणून अविनाश विमल शामराव पोरेटी यांचे नाव पुढे येत आहे.
अविनाश पोरेटी यांच्या नावाच्या चर्चेने चातगाव-कारवाफा जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.



