Home Social उमेद अभियानांतर्गत जोगीसाखरा येथे फराळाचे विक्रीचे स्टाल महिलांनीच केले सुरू…

उमेद अभियानांतर्गत जोगीसाखरा येथे फराळाचे विक्रीचे स्टाल महिलांनीच केले सुरू…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक आरमोरी प्रभाग अरसोडा पळसगाव यांच्या वतीने मौजा जोगीसाखरा येथे तेजस्विनी ग्रामसंघ यांनी दिवाळी निमित्य 13.10.2025 ते 23. 10 2025 पर्यंत फराळ विक्रीचे स्टॉल जोगीसाखरा इथे लावले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फराळाची विक्री करण्यात येत आहे.

        यात चकली, अनारसे बालुशाहि बुंदी चे लाडू ,शंकरपाळे व चिवडा इत्यादी फराळांची विक्री केली जात आहे. फराळ विक्री केंद्रात महिलांना चालना मिळाली असून जीवन्नोती अभियान उमेद अंतर्गत चालू असलेल्या तालुक्यातील अनेक ठिकाणी फराळाचे स्टाल लावण्यात आलेले आहेत.

         आरमोरी अंतर्गत येत असलेल्या जोगीसाखरा गावात हेमलता हजारे, हंससागर सोरते, शर्मिला धोंगडे तसेच रीना घुटके यांनी जोगीसाखरा येथील बिरसा मुंडा चौकात स्टालची उभारनि करून फराळाचे विक्री केंद्र सुरू केले आहे व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे यासाठी मुकेश कोल्हे प्रभाग समन्वयक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.