Home क्रीडा गोंडवाना विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्टफिजिक्स क्रीडा स्पर्धां संपन्न…..

गोंडवाना विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्टफिजिक्स क्रीडा स्पर्धां संपन्न…..

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

          तालुका क्रीडा संकुल, मुल येथे वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रात गोंडवाना विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बेस्टफिजिक्स क्रीडा स्पर्धेचे नुकताच तालुका क्रीडा संकुल चे प्रशिक्षक तसेच ग्रुप ऑफ फिट लिफ्टर चे संचालक एन. आय. एस. कोच करन सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा पार पाडण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ३० ते ४० महाविद्यालयातील अनेक खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.

        या स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठातील शारीरिक शिक्षण क्रीडा विभागाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे तर अध्यक्ष म्हणून कृषी उत्त्पन बाजार समिती मूल चे अध्यक्ष अखिल गंगारेड्डीवर आणि प्रमुख पाहुणे म्हणून धर्मेंद्र सूत्र पवार , राकेश सातपैसे हे लाभले होते. सदर स्पर्धेतील विजेता प्राप्त खेळाडूना पदक व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

        सर्व विजयी खेळाडू हे अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्वक आणि उत्कृष्ट रीतीने आयोजन व सेवा शांतपणे पार पडण्यात वेटलिफ्टिंग प्रशिक्षक करण कोसरे यांना जाते. त्यांना मदत करणाऱ्यात तांत्रिक अधिकारी म्हणून अमोल आवटे, आकाश चौधरी, पंकज बेले, दीपक भांडारकर, विष्णू वर्धन, येरमी, भूषण देशमुख, शाविल दयारकर, आकाश भाऊ इत्यादी स्पर्धेचे पंक्त म्हणून कारभार सांभाळे स्पर्धा यशस्वीरित्या करण कोसरे यांनी स्पर्धा नियोजनबद्ध पार पाडल्याबद्दल डॉ.अनिता लोहकरे यांनी शब्दसुमनांनी करण कोसरे यांचे आभार मानून त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

         गोंडवाना विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालिका डॉ.अनिता लोहकरे, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, तालुका क्रीडा संयोजक नामदेव पिजूरकर, डॉ.आशिष चहारे, डॉ.विक्की पेटकर या सर्व मान्यवरांनी सर्व खेळाडूंचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.