अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
वैरागड :- कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावलखेडा येथील मुख्याध्यापक श्री. मडावी सर हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. सहारे सर, श्री. नागोसे सर, श्री. बोदेले सर, सौ. उईके मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर शाळेतील शिक्षक श्री. सहारे सर यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनावर प्रकाश टाकला. आणि डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सोबतच वाचनातून मानवाचा सर्वांगीण विकास करता येतो. अशाही पद्धतीचे मार्गदर्शन त्यांनी केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मडावी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशासाठी केलेल्या अलौकिक कामगिरीचे त्यांनी विस्तृतपणे विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेले काम, देशाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली.
तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडवण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच गावाचा, समाजाचा विकास करण्यासाठी वाचनाची अत्यंत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी निर्माण करून वाचनाची सवय लावावी व वाचनातून स्वतःचा सोबतच समाजाचा, गावाचा विकास करावा.असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन श्री नागोसे सर यांनी तर आभार श्री बोदेले सर यांनी मानले.



