सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली :- माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते यांनी सावली तालुक्यातील किसाननगर येथे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत गावातील विविध समस्या जाणून घेतल्या.
मा.खा. डॉ. नेते हे नवेगाव भुजला येथे संपन्न झालेल्या रोहणकर फ्युल स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्यानंतर परतीच्या प्रवासात असताना ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी “किसाननगर येथील भाजप बुथ प्रमुख मुकेश बिके यांच्याकडे भेट देऊन चर्चा करायची आहे,” असे सांगितले.
तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत मा.खा. डॉ. नेते यांनी किसाननगर येथे थांबून नागरिक, कार्यकर्ते आणि गावकऱ्यांशी मनमोकळी चर्चा केली.
ग्रामस्थांनी या भेटीत आपल्या विविध अडीअडचणीच्या माध्यमातून प्रश्न मांडले.
यावेळी मा.खा. डॉ. नेते यांनी प्रत्येक विषयाचे गांभीर्याने ऐकून घेत समस्यांच्या निवारणासाठी तातडीने योग्य पावले उचलण्याचा विश्वास व्यक्त केला.
गावकऱ्यांच्या अडी-अडचणींविषयी सहानुभूतीपूर्वक संवाद साधत “जनतेच्या प्रश्नांवर ठोस कार्यवाही करणे हेच आपले कर्तव्य आहे,” असे सांगत त्यांनी समाधानकारक संकेत दिले.
या अनपेक्षित भेटीमुळे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.
गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्ग यांनी मा.खा. डॉ. नेते यांच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपुर संतोष भाऊ तंगडपल्लीवार, जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपाचे नेते अविनाश भाऊ पाल, कृ.उ. बा.स.संचालक यशवंत आंबोरकर,भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर,साकेत भानारकर, भाजपा बुथ प्रमुख मुकेश बिके, जेष्ठ नेते शंकर बिके, ग्रा.पं.सदस्य रमेश नापे, धर्मवीर मोढाई,बाबुराव मेश्राम, सतिश मजोके,राहुल सुरे,राकेश बिके,सत्यवती बिके,कमला मोढाई,छन्नोताई बिके,तसेच किसान नगर येथील नागरिक बंधू उपस्थित होते.
जनतेच्या समस्यांना प्राधान्य, आणि समाधानाला वचन – हेच मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क शैलीचे वैशिष्ट्य असल्याचे किसाननगरमध्ये पुन्हा एकदा दिसून आले.



