Home शैक्षणिक काटकुंभ येथे वाचन प्रेरणा दिन साजरा… — विद्यार्थ्यांमध्ये डॉ.अब्दुल कलाम यांच्या...

काटकुंभ येथे वाचन प्रेरणा दिन साजरा… — विद्यार्थ्यांमध्ये डॉ.अब्दुल कलाम यांच्या विचारांची प्रेरणा…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

       दखल न्युज भारत 

चिखलदरा :- काटकुंभ भारताचे माजी राष्ट्रपती, वैज्ञानिक व लोकहितैषी व्यक्तिमत्त्व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मध्यवर्ती शाळा, काटकुंभ येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

            या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची सविस्तर माहिती देण्यात आली. “पुस्तक वाचन हीच प्रगतीची गुरुकिल्ली” या संदेशातून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जोपासण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वाचन करून दाखवले तर काही विद्यार्थ्यांनी स्वतः डॉ. कलाम यांच्या विचारांवर आधारित प्रभावी भाषणे सादर केली.

        कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक (नाव. नामदेव अमोदे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शिक्षकवर्ग, पालक प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन /शिक्षिका. प्रशाली. शेन्डे. अर्चना. दान्डेकर. वर्षा घायर. नरेश सर ओमप्रकाश सर यांनी केले.

             या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबद्दल नवीन उत्साह निर्माण झाला असून, डॉ. कलाम यांच्या “स्वप्न पाहा, प्रयत्न करा आणि यश मिळवा” या विचारांना उजाळा देण्यात आला.