शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुक्यातील नेरी येथील दागोजी पिसे विद्यालयाच्या परिसरात वाघाचे ताजे पंजे आढळल्याने शेतकरी वर्गात प्रचंड खळबळ माजली आहे.
नेरी चिमूर मार्गावरील दागोजी पिसे यांच्या कालेजच्या परिसरात वाघाचे ताजे पंजे दिसून आल्याने शेतकरी दहशतीखाली आले आहेत.
या परिसरात भ्रमंती करणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी वनविभागाला मागणी आहे.
सध्या खरीप हंगामातील पीक कापणीला येत आहे,तर काही शेतकऱ्यांचे लाखी शिपने, फवारणी करणे पाणी करणे अशी कामे शेतकरी करीत आहेत आणि वाघाचे पंजे दिसल्याने शेतकरी जिवाची पर्वा न करता शेतात जावु शकत नाही अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे वन विभागाने गस्त वाढवावी व वाघाच्या भ्रमन मार्गावर पिंजरे लावुन वाघाला पकडण्यात यावे अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
(शेतकरी जसा गाय ,शेळी यांचे पालन करुन त्याला ठेवण्याची पण घरीच व्यवस्था करतो तशीच व्यवस्था वन विभागाने सुध्दा जंगली हिंस्त्र प्राणी जंगलाच्या बाहेर न येण्यासाठी जंगल सभोवताल तारेचे(जाळीचे )कुंपण करावे -एक शेतकरी).



