बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
सोलापूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री तथा सोलापूरचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहरातील राष्ट्रवादी पदाधिकारी व सदस्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक आयोजित केली होती.
या आढावा बैठकीत त्यांनी शहराची भौगोलिक परिस्थिती, महानगरपालिकेतील सदस्य संख्या, तसेच मागील निवडणुकीतील सर्वपक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशाप्रकारे निवडणुकीच्या सामोरे जावे लागेल, या संदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी संदर्भात असलेली माहिती तसेच जुने व नवीन कार्यकर्ते
पदाधिकारी त्याचबरोबर नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याबद्दल तसेच जुने व नवीन यांचा योग्य समन्वय साधून महानगरपालिकेची निवडणूक लढविण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, तौफिक शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छुक पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ताकतीने महानगरपालिकेत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय केला.



