Home Maharashtra राज ठाकरे चे “डॅशिंग” नेतृत्व!… — बसस्थानक परिसरातील भला मोठा खड्डा...

राज ठाकरे चे “डॅशिंग” नेतृत्व!… — बसस्थानक परिसरातील भला मोठा खड्डा बुजवीला शिवसैनिकांनी!…

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

मुल :- शिवसेना ( उबाठा) नवनियुक्त अध्यक्ष राज उर्फ राजू ठाकरे यांनी कामाची अलग ‘ स्टाईल ‘ दाखवून तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. 

           मूल शहरात नव्याने बनविण्यात येत असलेल्या बसस्थानक गेटवर निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले.निकृष्ट कामाची माेठी ओरड झाली,पण कुणी लक्ष दिले नाही. 

      बस आवागमन करण्याचे जागेवर मोठा खड्डा पडला होता,या खड्याने बस चालकाला व प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तसेच या खड्डयामुळे अपघात होण्याचा व प्रसंगी जिव जाण्याचे लक्षात येताच नवनियुक्त तालुका अध्यक्ष राज उर्फ राजू ठाकरे शिवसेना (उबाठा) याचे नेतृत्वाखाली तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली. 

          मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही.त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी एक पाऊल समाजसेवेसाठी म्हणत आपली स्टाईल वापरून शिवसेना मूलच्या वतीने काल रात्री वर्दळ कमी झाल्यानंतर खडया मध्ये काँक्रिटीकरण करून मोठा खडा बुजविला व तालुका वासियांचे लक्ष वेधून घेतले.मूल बस स्थानकावर बसेस व प्रवाशांची माेठी वर्दळ असते हे विशेष. 

         शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना मूल तालुका प्रमुख राज ठाकरे,मैत्री ग्रुपचे अध्यक्ष डॉ.आनंदराव कुळे,शिवसेनाचे महेश चौधरी,सुनील काळे,ओमदेव मोहूरले,अमित आयलानी,राहुल बारसागडे,बादल करपे,शिवम चलावार,दत्तू चिटलोजवार,संजय चिटमलवार,माजी तालूका प्रमुख प्रशांत गट्टूरंवार,शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासहकार्यातून खड्डा बुजविण्यात आला. 

       बसस्थानक अधिकारी,चालक,वाहक व प्रवाशांनी या डॅशिंग कार्याबद्दल शिवसेनेचे आभार मानले आहे.