Home Crime दारूच्या नशेत गाडी चालवून पार्किंगमधील वाहनाला धडक,१.५० लाखांचे नुकसान…

दारूच्या नशेत गाडी चालवून पार्किंगमधील वाहनाला धडक,१.५० लाखांचे नुकसान…

अबोदनगो एस.चव्हाण

      दखल न्युज भारत

   अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती :- शहरातील श्रीकृष्ण पेठ येथील श्रीकृष्ण रेसीडेन्सीसमोर बुधवारी रात्री एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात कार चालवून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक दिल्याने मोठे नुकसान झाले.

         फिर्यादी सागर संजय झुनझुनवाला (वय २८, रा. श्रीकृष्ण पेठ, श्रीकृष्ण रेसीडेन्सी, फ्लॅट क्र. ३०१, अमरावती) हे सॉफ्टवेअर इंजिनियर असून बेंगळुरू येथील कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ते काही दिवसांपासून अमरावतीतूनच ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. फिर्यादी यांच्या ताब्यातील शेवरलेट सेल 1.2 मॉडेल चारचाकी (क्रमांक एमएच 21 एएक्स 1120) ही गाडी त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे उभी होती.

           दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता, ऑनलाइन मिटिंग दरम्यान त्यांना बाहेरून जोराची धडक व आरडाओरड ऐकू आली. खाली येऊन पाहता त्यांची गाडी समोरून एका स्विफ्ट डिझायर (क्रमांक एमएच 02 डीझेड 2093) या वाहनाने जोरदार धडक दिल्याचे दिसले.स्विफ्ट डिझायर कारच्या आत रुपेश भाऊराव आठवले (वय २८, रा. दर्यापूर, सामदा, जि. अमरावती) हा चालक बसलेला होता. चौकशीदरम्यान तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. धडकेमुळे फिर्यादींच्या कारचे बंपर, हेडलाईट, बोनट, डिक्की आणि पेट्रोल टँकचा काही भाग तुटून अंदाजे ₹१,५०,००० रुपयांचे नुकसान झाले.

          या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम २८१, ३२४ (अॅक्ट) तसेच बी.एन.एस. कलम १८५ एमव्हीअॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.