Home Crime तिवसा बसस्थानकात बस मध्ये चढत असतांना खिशातली १० हजारांची रोकड चोरली….

तिवसा बसस्थानकात बस मध्ये चढत असतांना खिशातली १० हजारांची रोकड चोरली….

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

        दखल न्युज भारत

अमरावती :- तिवसा बसस्थानकावर एका किराणा दुकान मालकाच्या खिशातून १० हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका इसमावर चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

       प्राप्त माहितीनुसार, चोरीचा घटना दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यान तिवसा बसस्थानक येथे घडली. फिर्यादी धीरज लक्ष्मीनारायण जयस्वाल (वय ५१ वर्ष, व्यवसाय – किराणा दुकान, रा. हनुमान चौक, सातरगाव, ता. तिवसा) हे किराणा माल खरेदीसाठी अमरावतीला जाण्यासाठी बसस्थानकावर अमरावती बसची वाट पाहत होते.

         तेवढ्यात अमरावती बस आल्यावर ते बसमध्ये चढत असताना त्यांचे परिचित सावरकर नावाचे व्यक्ती यांनी त्यांना इशारा दिला की “तुमच्या पॅन्टच्या खिशातून एखाद्याने पैसे काढले आहेत.” त्यानंतर त्यांनी तत्काळ खिशात हात घालून पाहिले असता, खिशात ठेवलेले १०,००० रुपये गायब असल्याचे लक्षात आले.

         फिर्यादीने तत्काळ बसमध्ये संशयित व्यक्तीला पकडले असता त्याचे नाव रऊफ खान सुजात खान (वय ६२ वर्ष, रा. अन्सार नगर, अमरावती) असे समोर आले. चौकशीत हे स्पष्ट झाले की त्यानेच फिर्यादीच्या खिशातून रोकड चोरी केली होती. फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून तिवसा पोलिसांनी तिवसा पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ६०१/२०२५, भा.दं.वि. कलम ३७९ सह बी.एन.एस. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.