Home देशविदेश भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना निच व इंग्रजांचा हस्तक म्हणणाऱ्या अँड.अनील मिश्रावर तात्काळ...

भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना निच व इंग्रजांचा हस्तक म्हणणाऱ्या अँड.अनील मिश्रावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी… — डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करण्यासाठी हे वकील महाशय जास्तच फडफडतांना आणि अति करताना दिसतात… — भारत छोडो आंदोलन सुरु करायचे काय?,”सांगा,..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          भारत देशात जातीला अनुसरून आजही भेदभाव केला जातोय आणि अभद्र शब्दात बोलले जातोय हे अँड.अनील मिश्रा यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरुन लक्षात येते आहे..

         अँड.अनील मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेत युगप्रवर्तक,भारतीय संविधानाचे शिल्पकार,जगमान्य थोर समाजसुधारक,बोधिसत्व,भारतरत्न,जगविख्यात प्रकांड पंडित,भारत निर्माता,भारत देशातील तमाम जनतेचे कैवारी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना निच म्हटले व इंग्रजांची गुलामी करीत होता,खोटं बोलत होता असे म्हटले आहे.

          याचबरोबर या वकीलाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांऐवजी,बि.एन.राव यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार संबोधावे असे म्हटले आहे.

          हे वकील महाशय मागील अनेक दिवसांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अनेक दिवसांपासून विरोध करीत असून आपल्या अकलेचे तारे अयोग्य मानसिकता अंतर्गत पाजळत आहेत.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अयोग्य शब्दात बोलणाऱ्या अँड.अनील मिश्रा यांच्यावर मध्यप्रदेश सरकारने वेळीच फौजदारी कारवाई केली पाहिजे अशा मतांची भारत देशातील जनता आहे..

        अशा अयोग्य मानसिकता अंतर्गत बेछुट बोलणाऱ्या वकीलाला वेळीच आवरा,अन्यथा भारत देशात पुन्हा,”भारत छोडो आंदोलन,सुरु होईल असे भारत देशातील बहुसंख्य बहुजन नागरिकांचे म्हणणे आहे…