Home Political आळंदी नगरपरिषदेचा नगराध्यक्ष पदाचा प्रश्न: पक्षाचा की स्थानिक आघाडीचा?..

आळंदी नगरपरिषदेचा नगराध्यक्ष पदाचा प्रश्न: पक्षाचा की स्थानिक आघाडीचा?..

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन नगरी आळंदी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाबाबत सध्या राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. नगराध्यक्षपद हे पक्षीय रेषेवर ठरवायचे की स्थानिक आघाडीच्या सहमतीने हा प्रश्न आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

       नगरपरिषदेतील सत्ता समीकरणांकडे पाहता भाजपचा प्रभाव स्पष्ट दिसतो. गेल्या काही वर्षांपासून पक्षाने शहरात विकासकामांवर भर दिल्याने, आगामी नगराध्यक्ष निवडणुकीतही भाजपकडूनच दावेदारांची संख्या अधिक आहे. मात्र, स्थानिक पातळीवर काही ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे मत आहे की आळंदीच्या विकासासाठी पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक आघाडीचे नेतृत्व अधिक परिणामकारक ठरेल.

        भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट व अजित पवार गट) शिवसेना (ठाकरे गट व शिंदे गट) आणि मनसे या पक्षांच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांचा सिलसिला सुरू आहे. विशेष म्हणजे, आळंदी हे धार्मिक व वारकरी परंपरेचे केंद्र असल्याने, नगराध्यक्ष पदावर कोण व्यक्ती येते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते.

         पक्षीय स्तरावर भाजपकडून प्रशांत कुऱ्हाडे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या कार्यकाळातील शहर विकासाच्या दृष्टिकोनामुळे त्यांना स्थानिकांचा पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे, काही ज्येष्ठ नेते आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय नगराध्यक्ष देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.