बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
शासकीय सेवेत रुजू होत असताना नागरिकाभिमुख, जबाबदार आणि कार्यक्षम अशा भावनेने कार्य करा. शासनाने निर्माण केलेल्या संधींचा उपयोग समाजहितासाठी करा, असे आवाहन कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनुकंपा नियुक्ती व लिपिक-टंकलेखक भरती प्रक्रियेतील राज्यभरातील १०,३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. त्या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात एकूण ९६ उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृष्टीप्रणालीद्वारे या कार्यक्रमात उपस्थित राहून संवाद साधला.
कार्यक्रमादरम्यान, यासपीठावर आमदार श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना पालकमंत्री भरणे म्हणाले, शासनाची सेवा ही केवळ नोकरी नसून समाजसेवेचे माध्यम आहे.
मुंबई राज्याचे कृषिमंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व नागरिकांशी साधला संवाद.
आतापर्यंत १० हजार जणांची नियुक्ती,यात अनुकंपा तत्त्वाद्वारे गट क पदावर ३९, गट ड पदावर १० आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ४७ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तर, राज्यात १० हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन शासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली.
प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कार्यातून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे. असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यावेळी प्रास्ताविक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. ते म्हणाले, शासनाच्या सर्वसमावेशक अनुकंपा भरती धोरणाच्या अंमलबजावणीमुळे वाशिम जिल्ह्यात एकाचवेळी ९७ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये अनुकंपा भरतीअंतर्गत ४९ उमेदवार व एमपीएससीतर्फे निवड झालेल्या ४८ उमेदवारांचा समावेश आहे.
१७ जुलै २०२५ रोजी शासनाने जारी केलेल्या नवीन अनुकंपा भरती शासन निर्णयामुळे विविध विभागांतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीची प्रक्रिया गतीमान झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये २० राज्य शासनाचे, २० जिल्हा परिषदेचे व ९ पोलीस विभागातील अशा ४९ उमेदवारांना अनुकंपा भरतीतून नियुक्ती दिली जात आहे. त्याचबरोबर एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक भरतीअंतर्गत ४८ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आपल्या कुटुंबातील दिवंगत सदस्यांच्या आठवणीप्रमाणे आपण आपल्या विश्वनाथ चुगे यांनी मानले.



