Home देशविदेश नक्षलवादी म्हणजे कोण…?आणि जर आजपर्यंतच्या नालायक केंद्र सरकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित...

नक्षलवादी म्हणजे कोण…?आणि जर आजपर्यंतच्या नालायक केंद्र सरकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीच्या संविधानावर देश चालवीला असता,   तर यांची निर्मितीच झाली नसती….!

नक्षलवादी म्हणजे कोण…?आणि जर आजपर्यंतच्या नालायक केंद्र सरकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीच्या संविधानावर देश चालवीला असता,   तर यांची निर्मितीच झाली नसती….!

        आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानाने आपल्या लोकशाहीच्या राजकीय प्रवासाचा पहिला गियर आक्टोबर 1951ते फेब्रुवारी 1952 च्या दरम्यानच्या काळात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेऊन टाकला. त्यानंतर पहिल्या लोकसभेने पुन्हा आर्थिक विकासाचा पहिला गियर पहिली पंचवार्षिक योजना राबवून केंद्र सरकारमार्फत देशाने टाकला. तीन पंचवार्षिक आर्थिक योजना ऱाबवल्यानंतर आणि तीन लोकसभा निवडणुका झाल्यानंतर देशातील……

    मूलनिवासी (आदिवासी) 

     जनतेला वाटायला लागलं की या देशाच्या स्वातंत्र्याचा लाभ आम्हाला नाहीच……..!

         कारण देशात लोकसभा किंवा कोणत्याही राज्यांच्या विधानसभा यांच्यात लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला स्थानच नाही. शिवाय आर्थिक विकासाच्या तिन्ही पंचवार्षिक योजनामध्ये केवळ शेती आणि औद्योगिक विकासावर भर देण्यात आल्यामुळे आमच्या वाट्याचे स्वातंत्र्य कुठे…..?

         कारण आम्हाला जंगलात असल्याने शेती नाही. शहरात नसल्यामुळे औद्योगिक लाभ नाही. म्हणजेच आमच्यासाठी आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधेपासून आम्ही वंचित…….!

         शिवाय एस.टी. प्रवर्गासाठी संविधानातून स्थापन राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग सुरुवातीपासूनच कामाला लागला असता. तर कदाचित हा आदिवासी समुदायाचा असा समज झालाच नसता.

         म्हणजे मी अगोदरच सांगितल्यानुसार की नालायक राज्यकर्त्यांनी 100% टक्के संविधानावर देश चालवीला असता तर, नक्षलवाद्यांची निर्मिती झालीच नसती….!

          साधारणपणे देशाच्या स्वातंत्र्यानंतर आदिवासी जनतेचा भ्रमनिराश अवघ्या 15 वर्षात झाला. आणि जेंव्हा 1967 मध्ये प.बंगालच्या विधानसभा निवडणुका घोषित झाल्या. त्या निवडणुकीत दार्जिलिंग भागात नेपाळसीमेवर एक टी गार्डन आहे. या टी गार्डन जवळ एक ” नक्षलवाडी ” नावाचे गाव आहे.आणि याच गावातून एक आदिवासी ” जंगल संथाल ” नावाचा आदिवासी नेता होता. या नेत्याला वाटलं की, आदिवासी जनतेला देशाच्या मूळ प्रवाहात कोणतेही स्थान नाही. आम्हाला ना कोणत्याही आरोग्य, शिक्षण, नोकऱ्या, सडका, इ. कोणत्याही सुविधा नाहीत. परंतू , आपण जर निवडणुकीत उभे राहिलो आणि निवडुन गेलो तर आपल्याला आपल्या जनतेचं भलं करता येईल. या आशेने तो उभा राहिला. परंतू , तो विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला. पुन्हा मग भ्रमनिराश झाला की, हे क्षेत्र सुद्धा आपलं नाही. म्हणून त्याच्या मनात तो घर करून बसला किंवा, या स्वातंत्र्याचा लाभ या लोकशाहीच्या प्रवाहात आम्हाला होऊ शकत नाही. म्हणून त्याने आदिवासी लोकांमध्ये याविषयी जागृती निर्माण करण्याची सुरुवात केली. तेंव्हा जमीनदार लोकं इतरांवर अन्याय अत्याचार करायचे. शेतमजूरांवर अन्याय करायचे. आदिवासी लोकांकडे तर शेती अल्पच होती जी ओल्या दुष्काळात वाहून जायची. सरकारच्या जंगल खात्यामुळे आदिवासीचे मूलभूत हक्क सुद्धा हिरावून घेण्यात येत होते. थोडक्यात जंगल संथाल याने आणि त्याचा एक जोडीदार होता “सानियाल” या दोघांनी आदिवासिंच्या हक्कासाठी क्रांती करण्याचा निश्चय केला.

         प्रथम या दोघांनी मिळून तेथील स्थानिक सर्व आदिवासी लोकांची 18 मे 1967 रोजी एक “परिषद” भरवली. त्यात निर्णय घेण्यात आला की, या जमीनवर जे जमीनदार शेतीचा मालकी हक्क दाखवतात. हा आपल्यावर अन्याय आहे. त्या जमिनीवर आपला सुद्धा नैसर्गिक हक्क आहे. आपण तर भूमिहीन, म्हणून त्यांच्या जमिनी आपण ताब्यात घेऊ आणि त्या जमिनी आपण कसु. या निर्णयाची ची अंमलबजावणी सुद्धा लगेच म्हणजे 23 मे 1967 रोजी म्हणजे केवळ पाचच दिवसांनी या सर्व आदिवासिनी केली.

          परिणामी जमीनदारांनी पोलीसात तक्रारी केल्या. तेंव्हा ” सोनम वांगडी ” नावाचा पोलीस निरीक्षक याने आपला फौंजफाटा घेऊन या आदिवास्यांना हाकलून लावण्यासाठी पोहोचला. त्याने आदिवास्यांवर हल्ला केला. परंतू , आदिवास्यांच्या ‘ तीर कमानी ‘ पुढे. पोलीसांची शस्त्रे चालली नाहीत. या आदिवास्यांच्या प्रतीहल्ल्यात एका पोलीस उपनिरीक्षकाची हत्या होते. आणि बाकी पोलीस आपली शस्त्रे टाकून पळून जातात. त्यानंतर हे आदिवासी ती सर्व शस्त्रे गोळा करून प्रामाणिकपणे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करतात. इथे आदिवासी्यांचा प्रामाणिकपणा लक्षात घेतला पाहिजे.

          ही देशातील आदिवासी लोकांची आपल्या हक्काची पहिली रक्तरंजित लढाई ठरली. आणि ही लढाई 23 मे 1967 रोजी ” नक्षलवाडी ” या गावातून झाली. म्हणून या गावाच्या नावावरून पुढे चालून ” नक्षलवादी ” हे नाव पडले. पुढे जंगल संथाल आणि सानियाल या दोघांना पुढे पोलीस पकडतात आणि त्या दोघांचाही मृत्यू तुरुंगातच होतो.

        पुढे हीच नक्षलवादी संघटना जी आर्थिक विषमतेतून निर्माण झाली होती. तीचा वटवृक्ष आज फोफावला आहे. तीने लोकशाही आणि सरकारपुढे जे प्रश्न आणि आव्हाने निर्माण केली आहेत. कदाचित ही निर्माण झालीच नसती……..!

       जर………

      या नालायक राज्यकर्त्यांनी देश संविधानावर 100% देश चालवीला असता तर…… 

    जागृतीचा कृतिशील लेखक 

            अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689