प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
मान्यवर कांशीरामजी म्हणजे भारत देशातंर्गत नव्या राजकीय समीकरणाचे आणि मजबूत सामाजिक शक्तीचे बलस्थान!,त्यांनी देशातील शोषीत-पिडीत-वंचित असलेल्या ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक,एनटी,व्हिजेएन्टी,मुस्लिम,मागासवर्गीय समाजाला उभारणी देण्यासाठी म्हणजे ताठ मानेने राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी,”राजकीय शक्तीसह सामाजिक शक्तीचे अजरामर वैचारिक सुत्र सांगितले आहे.(तद्वतच ते बहुजन समाज पार्टी चे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

अशा या बहुजन नायकांचा स्मृती दिवस येत्या ९ आक्टोंबरला असून,या दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी द्वारा लखनऊ येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर मैदानावर विशाल जनसभा अंतर्गत महत्वपूर्ण अशा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवर कांशीरामजी यांच्या उपस्थितीत बसपाच्या न भुतोनं भविष्यती अशा विशाल जनसभा भारतभर झाल्यात,सदर जनसभा भारत देशातील नागरिकांसाठी प्रेरणादायी व उर्जा देणाऱ्या ठरल्यात.याचबरोबर त्यांच्या पश्चात बसपा सुप्रीमो बहन मायावती यांच्या कार्यकाळात सुध्दा विशाल जनसभा भारतभर झालेल्या आहेत.

मान्यवर कांशीरामजी यांचे प्रेरणादायी व प्रोत्साहनपर विचार भारत देशातंर्गत नव्या राजकीय समीकरणांची पर्वनी ठरली आहे.याचबरोबर त्यांचे नेतृत्व,”वंचित-पिढीत-शोषीत समाजातील नागरिकांना,राजकारणात व समाजकारणात आवश्यक संधी देऊन गेली,हे विसरता येत नाही.
मान्यवर कांशीरामजी यांनी भारत देशातील नागरिकांना जे राजकीय व सामाजिक शक्तीचे धडे दिले ते सत्ता परिवर्तन करण्यासाठी व समाज बदलासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

भारत देशात ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,मुस्लिम,मागासवर्गीय,एनटी,व्हीजेन्टी,हा समाज,”न विकणारा समाज तयार झाल्याशिवाय बहुजन समाजातील नेतृत्व हे स्वाभिमानी नेतृत्व म्हणून पुढे येवू शकत नाही,हे त्यांनी परखडपणे सांगितले होते.
बहुजन समाजातील नागरिकांना त्यांनी स्पष्ट सांगितले होते,”तुम्ही स्वतः सत्ताधारी बसल्याशिवाय,तुमच्यावर होणारे अन्याय व अत्याचार कधीच थांबणार नाही किंवा तुमचे शोषण सुध्दा कमी होणार नाही.
याचबरोबर त्यांनी सांगितले होते की,”मत,हे विकण्यासाठी नसून सत्ता बदली अंतर्गत स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आहेत,स्वतःची उन्नती करण्यासाठी आहेत.

ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशाचे निर्माता,आणि देशातील समस्त नागरिकांचे उध्दारकर्ता असे संबोधत!…
महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,छत्रपती राजर्षी शाहू महाराज,युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आणि इतर संत महापुरुषांच्या लोककल्याणकारी विचारांना व त्यांच्या जनकल्याणकारी कार्यांना मान्यवर कांशीरामजी यांनी भारतातील समस्त नागरिकांपर्यंत पोहोचविले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नागरिकांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे अधिकार दिले आहेत.पण यापैकी दिलेला महत्त्वपूर्ण अधिकार म्हणजे,”मताचा अधिकार,होय.
हाच,मताचा अधिकार या देशातील राजकारण्यांनी सार्वत्रिक निवडणूकातंर्गत,”खरेदी मध्ये बदलवून,देशातील बहुजन समाजातील नागरिकांना देशोधडीला लावले आहे.

नेमके हेच वास्तव हेरुन मान्यवर कांशीरामजी यांनी सार्वजनिक रित्या म्हटले होते,”जे लोक तुमच्या हाताचा स्पर्श झालेल्या पाण्याला पित नाही,ते लोक तुमचे मते घेऊन तुमच्या हक्कांसाठी लोकसभेत काय खाक लढणार?….
म्हणूनच त्यांनी नारा दिला होता,”वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा!….जिसकी जितनी संख्याभारी,उतनी उसकी भागिदारी!….

याचबरोबर मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजातील नागरिकांना वारंवार सांगितले होते,”शोषण मुक्तीसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.संघर्ष केल्याशिवाय तुमचे शोषण थांबणार नाही…
सत्ता ही मनुष्य मात्रांच्या प्रगतीचे सर्व दालणे खुली करणारी असल्यामुळे या देशातील सर्व बहुजन समाजातील नागरिकांना त्यांनी आवर्जून सांगितले होते की,”देशाची सत्ता बहुजन समाज पार्टीच्या हातात द्या,म्हणजेच तुमच्या हातात घ्या,आणि केवळ पाच वर्षांत तुमच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया तुम्हीच स्वतः उघड्या डोळ्यांनी पहा!…

मान्यवर कांशीरामजी यांच्या संघर्षाला भारत देशातील अनेक राज्यात भरभरून प्रतिसाद मिळाला.एवढेच काय तर अनेक राज्यातील नागरिकांनी बसपाच्या उमेदवारांना खासदार व आमदार बनविले आणि बसपाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवून दिली..
या देशातील तमाम नागरिकांच्या हक्कांसाठी, उन्नतीसाठी,आर्थिक व सामाजिक समानतेसाठी लढा देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज,युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाला व त्यांच्या विचारांना मान्यवर कांशीरामजी यांनी प्रेरणा समजून आपल्या राजकीय व सामाजिक चळवळीचा आधार बनविला आणि आपल्या हयातीत बहुजन समाज पार्टी अन्वये राजकीय आणि सामाजिक आंदोलन देशभरात यशस्वी करून दाखवले…

मान्यवर कांशीरामजी यांच्या महासंघर्षाला देशातील नागरिक कधीच विसरू शकणार नाही असेच त्यांचे स्वाभिमानी नेतृत्व प्रेरणादायी आहे.त्यांचा संघर्ष म्हणजे या देशातील बहुजन नागरिकांना केंद्र व राज्य सत्तेत आणि शासकीय कार्यालयासह इतर संस्थांनात संख्या प्रमाणे भागिदारी मिळवून देण्यासाठी मार्गदर्शक ठरावा असाच आहे…
अशा या जननायकांचा स्मृती दिवस,बहुजन समाज पार्टी द्वारा ९ आक्टोंबर २०२५ ला,भारत देशातंर्गत उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर मैदानावर होतो आहे…

मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृती दिनानिमित्त विशाल जनसभेचे आयोजन,”बहुजन समाज पार्टी द्वारा करण्यात आले असून उत्तर प्रदेश सह भारत देशातील बसपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृती दिनानिमित्तच्या सभेला बसपा सुप्रीमो बहन मायावती संबोधणार आहेत.पण त्या कुठल्या विषयावर संबोधणार याकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.



