Home Social “ग्रामगीता महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी…

“ग्रामगीता महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

      2 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामगीता महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. 

     या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.निलेश ठवकर,प्रा.डॉ. मृणाल वराडे,प्रा.डॉ.युवराज बोधे,प्रा.विवेक माणिक,श्री. संजय दुधनकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

        या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षांनी व प्रमुख पाहुण्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांचे देशाकरिता दिलेले योगदान,व निस्वार्थ भावनेने केलेले कार्य याबद्दल मार्गदर्शन केले.

      या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुमेध वावरे यांनी केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी करिता महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

     या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख,डॉ.बिजनकुमार शील यांच्यातर्फे “स्वच्छता अभियान” राबविण्यात आले होते. 

     आभार प्रदर्शन प्रा.डॉ. मृणाल वराडे यांनी केले.