Home Social वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनमंत्री ना.गणेश नाईक यांना उपसरपंच अशोक चौधरी यांनी पाठवले...

वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनमंत्री ना.गणेश नाईक यांना उपसरपंच अशोक चौधरी यांनी पाठवले निवेदन…. — वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांनी स्विकारले निवेदन….

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपुर महसूल मंडळ विभागात व वन परिक्षेत्रात हिस्त्र असलेल्या वाघांचे परिभ्रमण मनुष्य प्राण्यांसह पाळीव प्राण्यांच्या जिवितहानीसाठी धोकादायक ठरत आहे.

      याचबरोबर हिस्त्र वाघामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणे अवघड होत चालले आहे.यामुळे हिंस्त्र वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.गणेश नाईक यांना चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांच्या मार्फत शंकरपुर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदन पाठविले आहे.

         निवेदनकर्ता उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे की मौजा शंकरपर परिसरात दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असून शेतात जाणारे शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहे.

          शेतशिवारात असो कि जंगलशिवारात वास्तव्यात धुमाकूळ घालून हल्ले कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत. 

          शंकरपूर जवळील मौजा लावरी (आंबोली ) परिसरात वाघाने हल्ला करून शेतकरी महिलेचा घेतलेला जिव मन सुन्न करणारी घटना आहे.मानव प्राणी व जंगलप्राणी यांच्यातील संघर्ष जंगल लगतचे गावात जास्त प्रमाणात दिसून येत आहे असेही उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे. 

        आता शेतशिवारात सुद्धा दररोज कुठे ना कुठे वाघाचे दर्शन होताना दिसत आहे.यामुळे आता शेतीचे पिक काढण्याकरिता शेतकरी व शेतमजूर यांना आपल्या शेतावर जावे लागत आहे.शेतीवर नाही गेले तर हातात आलेला पिक कोणत्या पद्धतीने काढावे असा प्रश्न शेतकऱ्याला व शेतमजुराला पडत आहे.

        केव्हाही जंगलात जातांना समुहाने जाणे गरजेचे आहे.असे वनविभाग म्हणते.मात्र,काम करताना वेगवेगळे होऊनच काम करावे लागत असते.यात किचितही दुर्लक्ष झाले तर इतर हिस्त्र प्राण्याचे हल्ले मनुष्यावर व पाळीव प्राण्यांवर होताना दिसत आहेत.त्यामुळे या वन्य प्राण्यांपासून बचाव कसा करावा असा यक्ष प्रश्न ग्रामीण भागातील जनतेसमोर निर्माण झाला आहे.

         शंकरपुर शेतशिवारात जेवढे काही वाघ आहेत त्या सर्व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा,अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास,शेतीमध्ये पिके आहेत,त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा व जीवितहानी झाल्यास आपल्यावर मनुष्यवधाचा गुन्ह्यास आपण पात्र राहाल असेही निवेदनात उपसरपंच अशोक चौधरी यांनी म्हटले आहे.

          निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ना.देवेद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य,चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.अशोक उईके,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा,मुख्य वनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी (प्रादेशिक) चंद्रपूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.