Home Social पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळ संचालकपदी अजित वडगावकर यांची निवड…

पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळ संचालकपदी अजित वडगावकर यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांची पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी संचालकपदी निवड झाली आहे. अलीकडेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड बिनविरोध पार पडली. सभेला संस्थेचे अध्यक्ष विजयराव कोलते प्रमुख उपस्थित होते.

           कार्यकारी मंडळाच्या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी वडगावकर यांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अनिल मेहेर, गणपतराव बालवडकर, प्रदीप वळसे पाटील, वि.ल.पाटील, प्रमिला गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

          निवडीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना अजित वडगावकर म्हणाले, “शिक्षण क्षेत्रातील संस्थांना अनेक व्यावहारिक अडचणींना सामोरे जावे लागते. या प्रश्नांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. संस्थाचालकांचे हित, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासह शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंडळ व संस्थांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.”

           वडगावकर यांच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील संस्थाचालक वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले काम आणि संघटनात्मक दृष्टीकोन याचा उपयोग आता जिल्हास्तरावर होणार असल्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष विजयराव कोलते यांनी व्यक्त केला आहे.