Home Social आळंदी ग्रामीण रुग्णालयाला विलास बालवडकर यांची ३० खुर्च्यांची भेट….

आळंदी ग्रामीण रुग्णालयाला विलास बालवडकर यांची ३० खुर्च्यांची भेट….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : समाजाभिमुख कार्यातून नेहमीच आघाडीवर असणारे वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष समाजसेवक विलास तात्या बालवडकर यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयाला रुग्ण व नातेवाईकांच्या सोयीसाठी तब्बल ३० खुर्च्यांचा संच भेट दिला आहे.

         रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सोबत त्यांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी बसण्याची सोय अपुरी पडत होती. या अडचणीची जाणीव होताच बालवडकर यांनी तातडीने पुढाकार घेत ही खुर्च्या उपलब्ध करून दिल्या.

          रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर, कर्मचारी तसेच उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. “सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून केलेले हे योगदान रुग्णसेवेला मोठी मदत ठरणार आहे,” असे मत रुग्णालय प्रशासनाच्या अधिक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी व्यक्त केले.

          या प्रसंगी बालवडकर म्हणाले की, “रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला सुविधा मिळाव्यात, कोणीही त्रासाला सामोरे जाऊ नये, हीच या भेटीमागची भावना आहे. पुढेही समाजकार्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे.”