युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित खल्लार हायस्कूल खल्लारचा 14 वर्ष मुले व मुलींचा खो खो संघ अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत उपविजयी ठरलेला आहे.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य प्रा. केशवरावजी गावंडे ,शाळा समिती सदस्य मधुसूदनजी धाबे, सुधाकरराव जूनघरे, शाळा तपासणी अधिकारी व्ही. डब्ल्यू. गावंडे, परिसरातील आजीवन सभासद, शाळेतील विविध समित्यांच्या वतीने, परिसरातील पालक, खल्लार येथील समस्त ग्रामवासी यांच्यातर्फे, मुख्याध्यापक डी आर नवरे , सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विजयी संघाचे व त्यांचे मार्गदर्शक अमोल मोपारी, अमोल खंडारे यांचे कौतुक केले.



