Home Social छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात भगतसिंग जयंती साजरी…

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात भगतसिंग जयंती साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

       छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा सोमवार दिनांक दि 29 सप्टेंबरला राष्ट्रीय सेवा योजना,सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच रासेयो विभाग, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरवड्यानिमित्त भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली.

             व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रविण सदार उपस्थित होते. भगतसिंग यांनी लहानपणा पासूनच स्वतंत्रसंग्रामात सहभाग घेतला जालियनवाला बाग हत्याकांडाने त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवला त्यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सहभाग घेतला.

            1928 मध्ये लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी स्टॅंडर्ड यांची हत्या केली, 8 एप्रिल 1929 मध्ये दिल्लीतील सेंट्रल असेंबली मध्ये त्यांनी आणि बटुकेश्वर दत्त यांनी इंग्रजा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी बॉम्ब फेकला, त्याबद्दल त्यांना अटक झाली.

           त्यांच्या वर खटला चालवून 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. आजच्या तरुणांना देशभक्ती प्रेरणा देते स्वतंत्र संग्रामातील क्रांतिकारांचे आपल्याला योगदान आठवते असे प्रतिपादन केले व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रविंद्र इचे होते.

           व्याख्यानाचे आयोजन प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले, सूत्रसंचालन कु.मनिषा लाटेकर आभार कु.सानिया हिने केले, व्याख्याना करिता प्रा.अतुल चऱ्हाटे शिक्षकेत्तर कर्मचारी रासेयो स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थिती होते.