Home शैक्षणिक डॉ. एस.आर रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन…

डॉ. एस.आर रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित रा.म. गांधी महाविद्यालय सावली येथे २७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

         या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस चंद्रमौली यांनी प्रतीमेचे पुजन करून ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी भेट देऊन ग्रंथसंपदा बघीतली.

         या ग्रंथ प्रदर्शनी मध्ये चरित्र, कथा, कादंबरी, नाटके, स्पर्धा परिक्षा, ज्ञानकोश व इतर दुर्मिळ साहित्ये ठेवण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनी आयोजनामागचा हेतू हा होता कि, विद्यार्थ्यांना आपल्या ग्रंथालयात कोणत्या प्रकारची ग्रंथ संपदा उपलब्ध आहे हे बंद कपाटात माहीत नसते अशावेळी त्यांना त्यांची माहिती व्हावी जेणेकरून ग्रंथ जवळून पाहता येईल व ग्रंथ वाचता येतील यासाठीच ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

          या ग्रंथ प्रदर्शनी प्रसंगी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. दिलीप सोनटक्के यांनी डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रदर्शनीचे आयोजन करण्याकरिता ग्रंथालय कर्मचारी संदिप गेडाम तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.