आदिवासीबहुल भागातील डोंगरात विविध खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने तीला काढून घेऊन अदानी, अंबानीच्या मार्फत देशात लोकशाहीला बाय बाय करून भांडवलशाही स्थापन करून आर्थिकदृष्ट्या गरिबांना 85 कोटी जनतेला दरमहा 10 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ मोफत देऊन हतबल करणे. त्याचप्रमाणे धर्माच्या नावावर मंदिरे उभारून मानसिक गुलाम करणे एकीकडे हे षडयंत्र…….!
दुसरीकडे या 85 टक्के जनतेला बोटावर मोजण्या इतक्या जागृत करणाऱ्या………
आदरणीय सोनम वांगचूक..
सारख्यांना क्षुल्लक निमित्त( जनतेच्या भावना भडकवल्याचे कारण ) पुढे करून हकनाक तुरुंगात डांबण्याच्या चुका EVM केंद्र सरकार करत आहे.
या अनेक प्रकारच्या सरकारच्याच षडयंत्रामुळे जर जनता रस्त्यावर उतरलीच……..
1975 च्या ऐतिहासिक काळ्या दिवसाप्रमाणे अर्थात इंदिरा गांधीप्रमाणेच ( इंदिरा गांधी यांनी देशात लावलेली आणीबाणी केंव्हा उठवली, जेंव्हा आणीबाणी नंतर आपलेच सरकार येईल, असा आत्मविश्वास आला, तेंव्हा ही आणीबाणी उठवली. परंतू तसे होऊ शकले नाही.)………
देशात आणीबाणी लावायला मोकळे……!
मग या आणीबाणीतून जनतेच्या मुलभूत हक्काची मुस्कटदाबी. आंदोलनास बंदी, मोर्चास बंदी. नेत्यांना नजरकैद. विविध संघटनांची नोंदणी बरखास्ती (जशी सोनम वांगचूक च्या संस्थेची केली)…..!
या सर्वातून देशातील उरली सुरली लोकशाही संपुष्टात आणणे. अब की बार 400 पार चा नारा संविधान हटविण्यासाठी जो अपयशी झाला. तो अशा प्रकारे यशस्वी करण्याचा प्रयत्न RSS , मोदी, शहा यांचा आहे……!
थोडक्यात एकंदरीत असे की, RSS मोदी, शहा यांचे मनसूबे आता स्पष्ट झाले की, एका दगडात अनेक पक्षी मारून देशात अराजक्ता व अनागोंदी घडवून आणणे…….
वरील प्रकारे देशात अराजकता निर्माण केल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ” भारताचे संविधान ” देशात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापीत करण्यात गेल्या 75 वर्षात अपयशी ठरले. हे कारण पुढे करून……..
मनुस्मृतीवर आधारित त्यांनी निर्मिलेले नवीन संविधान लागू करणे…….!
हे मूळ षडयंत्र यांचे राहणार आहे……..!!!
वरील प्रकारची परिस्थिती देशात निर्माण केलीच आणि झालीच…….
तर…….
आता मला सांगा आक्रमक आंबेडकरवाद्यानो…….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधाननिष्ठ सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो…….
फुले, शाहू , आंबेडकर यांच्या क्रांतीवर सुखाचे, विलासाचे जीवन जगत, बंगल्यात राहून आपल्या ढेरीवरून हात फिरवीणाऱ्यानो……
पुन्हा एकदा 1972 च्या…….
दलित पँथर सारखी फळी उभारावी लागणार आहे……!
ये आझादी झुटी है…….
चा नारा पुन्हा द्यावा लागणार आहे……
त्यासाठी…….
“आओ बाहर मकानोसे, जंग लढो गद्दारोंसे…. “
अशी वेळ येऊ नये असे वाटत असेल. तर वेळीच सावध होऊया. केंद्र व राज्यसरकारच्या प्रत्येक षडयंत्राला ओळखून आतापासूनच विरोध करूया. आणि भविष्यातील धोके ओळखून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करूया…….
26 जानेवारी 1950 रोजी आपण एका स्वातंत्र्यात प्रवेश करत आहोत. पूर्वी आमचा देश कधीच स्वतंत्र नव्हता असं नाही. परंतू , ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो? याचा विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे. आता येणाऱ्या 26 जानेवारी 1950 रोजी मिळणारे स्वातंत्र्य जर आम्ही पून्हा गमावून बसलो. तर ते आम्ही पुन्हा कधीही मिळवू शकणार नाही…! या कल्पनेनेच माझं काळीज आज चर्रर्रर्र होत आहे……!!”
—- डॉ. बाबासाहेब आंबेडकर { 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणातून आम्हाला ( 142 कोटी जनतेला) दिलेला इशारा }
मी तर वरील इशारा अंतर्मनात साठवून ठेऊन 1991 पासूनच कामाला लागलोय…….
तुम्ही…….?
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689..


