Home सांस्कृतिक पिंपरी बुद्रुक येथील पांडुरंग मंदिरामध्ये पांडवप्रताप ग्रंथाची सांगता… 

पिंपरी बुद्रुक येथील पांडुरंग मंदिरामध्ये पांडवप्रताप ग्रंथाची सांगता… 

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

       पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पांडुरंग मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे पांडव प्रताप ग्रंथाची सांगता झाली. गेली अनेक वर्षापासून चालत आलेली श्रावण महिन्यातील ग्रंथ वाचनाची परंपरा आहे. ग्रंथ समाप्ती वेळेस ह भ प बाळासाहेब घाडगे बोलत आसताना म्हणाले की कैलासवासी महादेवराव बोडके दादा व कैलासवासी पांडुरंग नाना, कैलासवासी श्रीरंग बोडके, कैलासवासी भगवान पडळकर, कैलासवासी पोपट सूर्यवंशी, यांनी जी परंपरा चालू ठेवलेली आहे.

         तसीच परंपरा इथून पुढेही गावच्या वतीने चालूच राहणार असल्याचे यावेळी बाळासाहेब घाडगे पांडव प्रताप ग्रंथ समाप्ती वेळेस बोलत होते.

        ग्रंथाचे वाचन ह भ प बाळासाहेब घाडगे, वर्धमान बोडके, संदिपान पडळकर, सोमनाथ सुतार, महादेव सुतार, अर्जुन पडळकर, महेश सुतार, नागनाथ काशीद, बंडू कांबळे, अरुण सूर्यवंशी, शहाजी बोडके, नागनाथ बिचकुले, बाळू निकम, ज्ञानेश्वर बिचकुले,श्रीमंत भोसले, बबन स्वामी महाराज, पंढरी डिसले , केशव क्षीरसागर, किसन डिसले, प्रभाकर बेलपत्रे, तसेच वाचक व सुचक सह पिंपरी बुद्रुक येथील सर्व भाविक उपस्थित होते.

       ग्रंथाच्या समाप्ती निमित्त महाप्रसादाची व्यवस्था प्रगतशील बागायतदार केशव बोडके ,सह सर्व पिंपरी ग्रामस्थांनी आयोजन केले.

         शेवटी आरती घेण्याचा मान माजी सरपंच आबासाहेब बोडके , संचालक श्रीकांत बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, माजी चेअरमन आशोकआबा बोडके, उप सरपंच संतोष सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

         ग्रंथ वाचन संपूर्ण व्यवस्था मंदिर सेवेकरी सोमनाथ सुतार यांच्या वतीने करण्यात आली. समाप्ती प्रसंगी संध्याकाळी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व भजन व किर्तन घेऊन ग्रंथाची सांगता झाली.