शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर हे गणपती उत्सवानिमित्त सदिच्छा भेट देण्यासाठी भिसी येथे गेले असता,सदर गणपती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
गेल्या 38 वर्षापासून चिमूर तालुक्यातील (भिसी) येथे दरवर्षी मुख्य बाजारपेठ चौकात भिसीचा राजा स्थापन करण्यात येते.

यंदाच्या वर्षी देखील उत्कृष्ट सजावट व समाज प्रबोधनकार कार्यक्रमातून हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे.
याच दरम्यान सदर गणेश मंडळाला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले व उपस्थिती गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांना शुभम पसारकर यांनी शुभेच्छा दिल्या.
मंडळाच्या वतीने आयोजित प्रसिद्ध समाज प्रबोधनकार्ता कीर्तनकार पवनपाल महाराज वाडळीकर यांच्या प्रबोधन कार्यास भेट दिल्याबद्दल दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांचा श्रीफळ व ट्रॉफी,फोटो फ्रेम देऊन गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रामुख्याने शेकडो लोक भिसी येथील उपस्थितीत होते.




