Home उपक्रम इको क्लब द्वारा ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षदिंडी…

इको क्लब द्वारा ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षदिंडी…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारसिवनी 

      राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी द्वारा संचालित इको क्लब व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवनी (सामा. वनी.) यांचे संयुक्त विद्यमाने नवेगाव खैरी परिसरात २४ सप्टेंबरला ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षदिंडी काढण्यात आली. 

      यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आईसोबत वृक्षारोपण करतानाचे चित्र रंगवून वृक्षारोपणाचा संदेश दिला.पर्यावरणपूरक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.

           नवेगाव,खैरी,बच्छेरा टोला,पेंच कॉलनी परिसरात वृक्षदिंडीच्या माध्यमातून लोकजागृती करण्यात आली. 

       याप्रसंगी शाळेचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजू बर्वे,प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके,इको क्लबचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी उपस्थितांना वृक्ष संवर्धन व संरक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. 

           कार्यक्रमाला वनपाल अनिल राठोड,प्रा.अरविंद दुनेदार,अनिल कोल्हे,दिलीप पवार,प्रशांत पोकळे,सतीश जुननकर,अमित मेश्राम,शैलेंद्र देशमुख,रितेश मैंद,प्रा.मोहना वाघ,सौ.अर्चना येरखेडे,साक्षी सहारे,वन कर्मचारी सूरज चोपडा,मनोहर शेंडे,बाळकृष्ण ढोके,गजानन ढोंगे,शालेय कर्मचारी गोविंद कोठेकर,लिलाधर तांदूळकर,मोरेश्वर दुनेदार,राशिद शेखतसेच वैष्णवी महिला भजनी मंडळ यांनी सहकार्य केले.

        वृक्षदिंडीमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.