Home उपक्रम नगरपंचायत पारशिवनीत “स्वच्छता ही सेवा २०२५” अभियानांतर्गत,”एक दिवस,एक तास,एक साथ श्रमदान” या...

नगरपंचायत पारशिवनीत “स्वच्छता ही सेवा २०२५” अभियानांतर्गत,”एक दिवस,एक तास,एक साथ श्रमदान” या स्वच्छता मोहिमेचा व्यापक उपक्रम…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारसिवनी…

      २५ सप्टेंबर २०२५ – गुरुवार रोजी “स्वच्छता ही सेवा २०२५” या केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून नगरपंचायत पारशिवनीत आज शिवमंदिर परिसर,शिवटेकडी येथे सकाळी ८.०० वाजता एक व्यापक स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

       “एक दिवस – एक तास – एक साथ श्रमदान” या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. नितीन लुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी,कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

     या स्वच्छता उपक्रमाचा उद्देश परिसरातील सार्वजनिक जागा,मंदिर परिसर,रस्ते व कचरापेटी यांना स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे हा होता.

       मोहिमेअंतर्गत परिसरातील प्लास्टिक व इतर घनकचऱ्याचे संकलन करण्यात आले,तसेच झाडाझडती,कचरापेट्या स्वच्छ ठेवणे आणि कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित करण्यावर विशेष भर देण्यात आला.

      नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छतेसाठी काम करताना नागरिकांना देखील स्वच्छतेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. 

    मोहिमेदरम्यान,स्वच्छतेसंबंधी जनजागृतीसाठी परिसरातील नागरिकांना स्वच्छता नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

       स्वच्छता ही सेवा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाही,तर प्रत्येक नागरिकाची देखील जबाबदारी आहे असे नगरपंचायत पारशिवनीचे प्रशासक श्री.नितीन लुंगे यांनी सांगितले

     नगरपंचायत पारशिवनीचे प्रशासक श्री.नितीन लुंगे यांनी सांगितले की, “स्वच्छता ही सेवा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाही,तर प्रत्येक नागरिकाची देखील जबाबदारी आहे. ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ अभियानाद्वारे आपण सर्वांनी मिळून पारशिवनीला अधिक स्वच्छ,सुंदर आणि आरोग्यदायी ठिकाण बनवण्याचा प्रयत्न करावा.”

     नगरपंचायत पारशिवनी सातत्याने अशा विविध स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करत असून यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेचा सकारात्मक संदेश रुजत आहे.

     यामुळे परिसरात कचरामुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे व नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत आहे,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.