शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
पक्षाचे संघटन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संबंधाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन २३ सप्तेंबरला चिमूर येथे करण्यात आले असल्याची माहिती चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे यांनी दिली आहे.
विजय भाऊ गावंडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी चिमूर यांच्या माहितीनुसार दिनांक 23/ 9/ 2025 रोज मंगळवारला सकाळी 11 वाजता संघटनात्मक आढावा बैठक संपन्न होणार आहे.
या आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील दुष्काळ,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025 या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे.
वरील विषयावर आढावा घेण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक श्री.संजय दुबे हे येणार आहेत.
कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी,सर्व माजी तालुकाध्यक्ष,तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी व सदस्य,माजी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,माजी पंचायत समितीचे पदाधिकारी,जिल्हा परिषद,पंचायत समिती सर्कल प्रमुख,चिमूर शहर काँग्रेस कमिटी,नेरी शहर काँग्रेस कमिटी,शंकरपूर शहर काँग्रेस कमिटी,भिसी शहर काँग्रेस कमिटी,खडसंगी शहर काँग्रेस कमिटी,तालुका महिला काँग्रेस कमिटी,तालुका युवक काँग्रेस कमिटी,सर्व फ्रंन्टल सेल कमिटी अध्यक्ष,काँग्रेस पक्षाचे सरपंच व काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी होणाऱ्या आढावा बैठकी करिता उपस्थित राहण्याचे आवाहन चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे यांनी केले आहे.
आढावा बैठकीचे स्थळ- आधार बंगला भिसी रोड चिमूर हे आहे.
या आढावा बैठकीला माजी मंत्री तथा विधिमंडळ गटनेते श्री.विजयभाऊ वडेट्टीवार,खासदार डॉ. नामदेवराव किरसान,जिल्हा निरीक्षक आमदार श्री.अभिजित वंजारी,जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार श्री.सुभाष धोटे,माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ तथा माजी आमदार श्री.अविनाश भाऊ वारजुकर,सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.सतिश भाऊ वारजुकर,चिमूर विधानसभा निरीक्षक श्री.संजय दुबे यांना आढा बैठकीची माहिती देण्यात आली असून,हे सर्व मान्यवर आढावा बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस कमिटी चिमूर,बाळू बोभाटे सचिव शहर काँग्रेस कमिटी चिमूर यांनी सार्वजनिक केली आहे.


