Home Vidarbha भिसी- शंकरपूर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ताई करण्याची सरपंच साईश वारजूकर यांनी केली...

भिसी- शंकरपूर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ताई करण्याची सरपंच साईश वारजूकर यांनी केली उपविभागीय अभियंताकडे मागणी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

    भिसी – शंकरपूर हा राज्यस्तरीय महामार्ग सुमारे १४ कि.मी. लांबीचा असून,सद्यस्थितीत या संपूर्ण रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे.

       यामुळे या राज्य महामार्गावर पडलेल्या खड्यांची दुरुस्ताई लवकरात लवकर करण्याची मागणी शंकरपुर ग्रामपंचायतचे सरपंच तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव साईश वारजूकर यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

       त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की,या मार्गावरून दररोज असंख्य वाहने धावतात.परंतु रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अनेक अपघात घडले आहेत व रोज सुमारे ५० हून अधिक वाहनांचे टायर पंक्चर होत असतात.

       हा प्रश्न केवळ नागरिकांच्या सोयीसाठी नसून त्यांच्या जीवित सुरक्षेशी देखील संबंधित आहे.त्यामुळे कृपया आपण तातडीने कार्यवाही करून पुढील १० दिवसांच्या आत सदर मार्गाची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी प्रवाशी हितार्थ मागणी केली आहे. (गड्डे भरण न करता डांबरीकरण करण्यात यावे.)

     अन्यथा युवक काँग्रेस,चिमूर यांच्या वतीने शकरपुर ते भिसी राज्य महामार्ग दुरुस्ती करण्यासंबधाने आंदोलन करण्यात येईल,याची कृपया नोंद घ्यावी.अशा इशारा निवेदनातून सरपंच साईश वारजूकर यांनी दिला आहे.

           चिमूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन देताना युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.