Home Maharashtra महसूल सेवकांचे दहा दिवसापासून काम बंद आंदोलन सुरु…..   — महसूल मंत्री...

महसूल सेवकांचे दहा दिवसापासून काम बंद आंदोलन सुरु…..   — महसूल मंत्री यांची आंदोलकाकडे पाठ… 

     रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी

          विदर्भ महसूल सेवक संघटना यांनी चतुर्थ श्रेणीच्या मागणी करता दिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून संविधान चौक नागपूर येथे कामबंद आंदोलन व धरणे आंदोलन सुरु आहे.

        राज्याचे महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्हात गेल्या 10 दिवसांपासून महसूल सेवक चतुर्थ श्रेणी च्या मागणी करिता आंदोलन करित असून यांच्या आंदोलन ठिकाणी महसूल मंत्री यांनी नागपूर मध्ये राहून पाठ फिरवून विविध जिल्हातील कार्यकर्त्यांच्या घरी जाण्यास वेळ देत आहेत परंतु महसूल सेवाकांना वेळ देऊ शकत नाही.

         त्यामुळे राज्यातील बारा हजार सहाशे महसूल सेवक आंदोलनाच्या पवित्र घेऊ संविधान चौक येथे आंदोलन करीत आहे. यांच्या आंदोलनामुळे तालुकास्तरीय महसुली कामे, डी. एल. सी., नैसर्गिक आपत्ती, संजय गांधी निराधार योजनेतील कामे, निवडणूक, पंधरवडा सेवा, तसेच इतर दैनंदिन कामकाज परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होत असून शासनाने महसूल सेवकांना त्वरित चतुर्थ श्रेणीची मागणी बहाल करून नागरिकांना होणारा त्रासातुन सुटका करण्याचे करावे असे विदर्भ महसूल सेवक संघटना जिल्हा शाखा – चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष श्री दयाराम वंजारी यांनी केले.

         चंद्रपूर जिल्ह्यातील 218 महसूल सेवक या काम बंद संपामध्ये सहभाग असून संपूर्ण महाराष्ट्र मधिल महसूल सेवक आंदोलन मध्ये सहभागी आहेत.