Home Maharashtra उत्पादना बरोबर जमिनीचे आरोग्य ही जपा :- अनिल किरणापुरे…

उत्पादना बरोबर जमिनीचे आरोग्य ही जपा :- अनिल किरणापुरे…

  संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक

  दखल न्यूज भारत

          रासायनिक खतामुळे दिवसेंदिवस जमिनीची पोत खालावत आहे.काही दिवसांनी जमिनीची पोत बिघडल्यामुळे जमीन नापीक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी नैसर्गिक मशीनच्या माध्यमातून जमीन वाचवा अभियानात भाग घेऊन उत्पादनाबरोबरच जमिनीवर पण काम करा.

         शेत जमिनीतून भरघोस उत्पादन हवे असेल तर सुपीक ते सह भुशभुसीत पणा जमिनीत असावा. सेंद्रिय कर्ब पर्याप्त उपलब्ध असावे ही सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जैविक खते,सेंद्रिय खते महत्त्वाची आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक, सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे असे ते बोलत होते.

         राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन सन 2025-26 अंतर्गत मौजा उकारा येथे २रा शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक उ.कृ.अधिकारी श्री.लांबकाने यांनी केले.प्रमुख मार्गदर्शन श्री.अनिलभाऊ किरणापुरे लवारी,पं.स.सदस्य तथा युवा पुरस्कार विजेते,श्री.आदित्यजी घोगरे सर,ता.कृ.अ.,साकोली,कु.रजनीगंधा टेम्बुरकर,बी.टि.एम.,यांनी केले.

       कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन स.कृ.अ.श्री.भोंडे यांनी केले.

         कार्यक्रमामध्ये जीवामृत, वेस्ट decomposer, चे प्रात्यक्षिक करून दाखविले. महाविस्तर AAP, तसेच कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती दिली.

            यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सरपंच सौ.शालूताई ईळपाते, उपसरपंच श्री.युवराज खोटंले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषि सखी प्रभा नीलकंठ कठाणे, प्रिया भारती सचिन पुसाम व गावातील शेतकरी, महीला शेतकरी, युवक शेतकरी उपस्थित होते.