अबोदनगो चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- देशभरात आज (१७ सप्टेंबर) चालक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने पोलीस आयुक्तालय, अमरावती शहराच्या मिटिंग हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शासकीय वाहनांचे उत्तम देखभाल, अपघातविरहित सेवा तसेच इंधन बचत आणि कार्यक्षम वाहनचालना या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस मोटर परिवहन विभागातील अनेक चालकांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते एएसआय प्रमोद मडावी (बी.डी.डी.एस.), एएसआय दिनेश नेमाडे (पोस्टे फ्रेजरपुरा), एचसी जगदीश कुरील, पोलीस नाईक राहुल मेहकरे, एचसी सुनिल कुसराम, एनपीसी केशव निकम, पोशि किशोर खेंगरे (गुन्हे शाखा), पोशि अशोक खंगर, पीसी वसीम वहीद खान, पीसी मोहन कुमार साबे, पीसी लकेंश चव्हाण (डायल-११२), पीसी देवानंद घुगे, पीसी भुषण नितनवरे, पीसी मुसाईद खान, पीसी सागर वानखडे, पीसी आशिष केचे व इतरांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस आयुक्त चावरिया यांनी चालकांना शुभेच्छा देत उत्तम वाहन देखभाल, अपघातविरहित कर्तव्य, शारीरिक व डोळ्यांचे आरोग्य जपणे तसेच नियमांचे पालन करून सुरक्षित वाहनचालना करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला उपायुक्त शाम घुगे (परिमंडळ-२), उपायुक्त गणेश शिंदे (परिमंडळ-१), सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे (शहर वाहतूक शाखा व राजापेठ विभाग), गोरखनाथ जाधव (निरीक्षक, पोलीस कल्याण शाखा), श्रीधर गुलसुदंरे (राखीव पोलीस निरीक्षक), संजय बोरेकर (निरीक्षक, मोटर परिवहन विभाग) यांच्यासह अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



