ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई), जमनापूर येथे नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नंदीबैल सजावट स्पर्धा उत्साहात पार पडली. लहानग्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वस्त्र, फुले, कागद व शोभेच्या वस्तूंचा सुंदर वापर करून नंदीबैल आकर्षक व देखण्या पद्धतीने सजवले होते.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व कास्य पदकांनी गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतीश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर उपस्थित होते.
लहानग्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व कलाकौशल्याला सर्वांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी शाळेतील शिक्षकगण पुण्यप्रभा उपासे, माधुरी हलमारे, प्रतिमा डोंगरे, लिलेश्वरी पारधी, वैशाली टेंभुर्णे, सुनीता बडोले, रेखा हातझाडे, स्वेजल टेंभुर्णे, प्रिया आकरे, अस्मिता मस्के, पल्लवी मेश्राम, शिला हरिणखेडे, रूपाली शेंडे, प्रियंका झोडे, शितल कोरे, निलिमा हरडे, सीमा राऊत, वैशाली कोचे, छाया केवट, निशा देवगिरकर, संगीता जांभूळकर, यामिनी बोरकर, काजल लांजेवार, मोनिका कापगते तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी जोशीराम बिसेन, विजय परशूरामकर, एकनाथ काळसर्पे, ममता मुनेश्वर, वर्षा साव व दुर्गा कोवे उपस्थित होते.



