दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली येत्या शनिवारी (दि.२०) रोजी आळंदी जनसंवाद अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान ज्ञानदर्शन धर्मशाळा येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे.
या अभियानांतर्गत आमदार काळे जनतेशी थेट संवाद साधून विविध शासकीय योजना, विकासकामे, तसेच स्थानिक प्रश्न याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत.
या उपक्रमाद्वारे नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळण्यासोबतच जनतेच्या अडचणी व मागण्यांची थेट नोंद घेण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आमदार कार्यालयाकडून देण्यात आली.
या अभियानामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक बळकट होणार असून, तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही सकारात्मक पावले ठरणार आहेत.



