Home कृषी चिंताग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आले पुढे… —...

चिंताग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आले पुढे… — सभापती मंगेश धाडसे यांच्या नेतृवात मुख्यमंत्री यांना दिले निवेदन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी.. 

      चिमूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व विषान्यूजन्य रोगराई मुळे सोयाबीन या पिकाच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना शासनाकडून मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूरच्या वतीने सभापती मंगेश धाडसे यांच्या पुढाकारातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री दत्रालय भरणे यांना एसडिओ,तहसीलदार,कृषीअधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

           निवेदन देत असतांना कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रवींद्र पंधरे,जेष्ठ संचालक घनश्यामजी डुकरे, संचालक दिनकरराव शिनगारे, संचालक गजानन कामडी,संचालक मनोहर पिसे, संचालक कैलास धनोरे,प्र.सचिव दिनेश काशीवार,अरविंद देठे उपस्थित होते.