Home Maharashtra राजकुमार हरि गेडाम यांची उपक्रमशिल शिक्षक म्हणून निवड,अभीनंदनाचा वर्षाव…

राजकुमार हरि गेडाम यांची उपक्रमशिल शिक्षक म्हणून निवड,अभीनंदनाचा वर्षाव…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       चिमूर तालुक्यातील नेरी येथुन जवळच असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खांबाडा येथे कार्यरत पदवीधर शिक्षक राजकुमार गेडाम यांची उपक्रमशिल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे 

      सन २०२५ करिता जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या शिक्षक विभागाने ही निवड केली आहे.त्यामुळे त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      या निवडीच्या संदर्भात गेडाम गुरुजी म्हणाले की ही निवड माझी नसून आता पर्यंत मी राबविलेल्या उपक्रमाची निवड आहे.मी तयार केलेला बगीचा असेल,अनाथ लेकरांना दत्तक घेतले ते असेल,कुटुंब नियोजनात घेतलेला सहभाग असेल,कोविड काळात केलेले काम असेल,शाळेत राबविलेले उपक्रम असतील,घरी केलेली चंदनाची लागवड असेल.अशा प्रकारे राबविलेल्या उपक्रमाबाबत निवड करुन प्रशासनाने दिलेली योग्य संधी माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे असेही ते म्हणाले.

         उपक्रमशिल शिक्षक म्हणून निवड झाल्याने चिमूरचे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले,गटशिक्षणाधिकारी बोधणे पंचायत समिती चिमूर,संघमित्रा ढोके सह आयुक्त नागपूर विभाग नागपूर,विनेश शेवाळे नागपूर,अनिरुद्ध शेंडे विस्तार अधिकारी पंचायत राजुरा,डॉ.सुमेध वावरे,आनंद गजभिये,अनिल गेडाम केंद्र प्रमुख,डॉ लता मेश्राम,दिलीप वाघमारे,दिलीप बापू,माधुरी संगमवार,हर्षाताई,प्रीतम शेंडे,मनोज पाटील,रसिका मॅडम,निशा करमरकर मॅडम,माधव बनसोड,जयदास सांगोडे सर,प्रकाश कोडपे,शरद बोकडे,सागर शंभरकर सर,योगेश रामटेके,होमेंद्र मेश्राम,अंकुश चुनरकर,दिनेश कवाडे,विनोद लांडगे,प्रदीप टिपले,संजय भैसार,विवेक उराडे,करुणा सोनटक्के,आदेश मानकर,भूपेश पिसे,गुरू नन्नावरे,देवेंद्र रायपुरे,जयंद्र राऊत,अजय दोर्लीकर,काकाजी वाघमारे,विनोद सावरकर,अशोक मस्के जिल्हाध्यक्ष स्वतंत्र मजदुर युनियन चंद्रपूर,राजकुमार चिकटे अध्यक्ष मागास वर्गीय कृती समिती चंद्रपूर,गणेश उके,सागर तायडे राज्याध्यक्ष स्वतंत्र मजदुर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी गेडाम गुरुजी यांचे अभिनंदन केले आहे.

    राजकुमार गेडाम गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले आहे.