Home देशविदेश आरक्षणासाठी लढणाऱ्यांनो ( ओबीसी, मराठा कुणबी ), केवळ आरक्षणामुळेच बौद्धांची प्रगती नाही...

आरक्षणासाठी लढणाऱ्यांनो ( ओबीसी, मराठा कुणबी ), केवळ आरक्षणामुळेच बौद्धांची प्रगती नाही झाली! — तर त्यांनी विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी ” बुद्ध धम्म ” आचरणातून स्वीकारला म्हणून झाली….

       या देशात दोनच जाती सुधारल्या.एक बहुजनांना ( एस. सी. प्रवर्गातील बौद्ध वगळता, ओबीसी आणि मराठा कुणबी ) ढोंग करून 33 कोटी देवांच्या नादी लावणारे ब्राम्हण (ब्राम्हण्यवृत्तीचे ) आणि दुसरे ” बौद्ध “.कारण बौद्धांनी देवांना कायमचे पाण्यात बुडविले!

     —- सत्यपाल महाराज.. (राष्ट्रीय प्रबोधनकार)

*****

      आमच्या देशाला नैसर्गिक तटबंदीचे संरक्षण असताना सुद्धा आशिया खंडातील कोणताही इतर देश परकीयांच्या आक्रमणाखाली आमच्याएवढा कधीच दबला नव्हता.

         या देशात राजकीय आक्रमणे असंख्य झाली आणि परतही गेली.परंतु,आर्यांचे अर्थात मनुवाद्यांचे म्हणजेच ब्राम्हण्यवृत्तीचे पाऊणेचार हजार वर्षांपूर्वीचे झालेले…

        कुसांस्कृतिक आक्रमण ( साम, दाम, दंड आणि भेदावर आधारलेली कुटनीती आणि त्या विकृत मेंदूतून निपजणारे विविध षडयंत्र ) 

        मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षानंतर सुद्धा आजही केवळ बहुजनांच्या मानसिक गुलामीच्या संपतीवर ठाम उभी आहे!

    त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे…”ओबीसी आणि मराठा,यांच्यात EVM मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढत चालवलेला किचकट आरक्षणाचा प्रश्न.

       या जटील प्रश्नातून बाहेर पडण्याच्या एकमेव उपायाचा जर विचार आणि कृती करावयाची असेल,तर प्रथम विवेकवादी + विज्ञानवादी म्हणजेच मानवता धर्माचे प्रथम,”माणूस बना…..

     अहो मनोज जरांगे दादा तुम्ही नेहमीच सांगताय की आम्ही ” एक मराठा लाख मराठा “. आणि आम्ही “क्षत्रिय ” मराठा आहोत.

       जर तुम्ही आणि तुमचे सर्व मराठे खरोखरच क्षत्रिय असाल…

 तर मग…

   तथागत भगवान बुद्ध सुद्धा क्षत्रियच होते ना…

     शिवाय भगवान बुद्धाच्या चिवराचा रंग सुद्धा आणि तुम्ही वापरता तो झेंडा सुद्धा भगवाच ना!

    शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी तोच भगवा ध्वज वापरला होता ना!

    मुंबई आंदोलनात सुद्धा भगव्या झेंड्याचा महापुर आला होता ना!

     मग तुम्हाला विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी बौद्ध व्हायला अडचण ती कोणती?

       आता तर तुम्ही मागासवर्गीय होऊन आरक्षणाचे लाभार्थी झालात ( तुमच्याच म्हणण्याप्रमाणे)..

     उलट बौद्धांपेक्षा तुम्ही बुद्ध धम्माच्या प्राचीन काळाच्या पुराव्यानुसार जास्तच जवळचे आहात…

मग अडचण कोणती आहे…

       राहिला प्रश्न ओबीसीचा.तुम्ही आले की तेही येतीलच.कारण ओबीसी आरक्षण मंडल आयोगाकडून मिळालेले असताना सुद्धा तुम्ही ( लाखोंच्या संख्येने ) मुंबई गाठता म्हणून तेही आता गाठण्याच्या तयारीत आहेत.

          म्हणजे थोडक्यात सांगावायचे की तुम्ही जे करणार ते अनुकरण ओबीसी करणार.हीच तुमची गुलामीची मानसिकता ( सत्य असत्य न ओळखता केवळ अनुकरण करणे म्हणजे मानसिक गुलामी स्वीकारणे ) आर्यचाणक्याचा बाप असलेल्या फडणवीसाला चांगले ठाऊक आहे.म्हणूनच तर तो तुम्हा दोघांनाही खेळवतो.हे तुमच्या लक्षात कधी येईल…

       जेंव्हा तुम्ही बहुजनहो ( बहुजनांची व्याख्या वरीलप्रमाणे सत्यपाल महाराजांनी केल्याप्रमाणे ) 33 कोटी देवांच्या कचाट्यातून कायमचे बाहेर पडाल…

       आणि विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी बुद्ध धम्माचे आचरणातून अनुयायी व्हाल तेंव्हाच….

अन्यथा….

     मानसिक गुलामीचे शिलेदार होऊन अजून कितीही पिढ्या घालवा…

      त्यासाठी कितीतरी एकापेक्षा एक फडणवीस तुमच्याच जातीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सारखे जन्मतील आणि तुम्ही असेच वाहत वाहत जाल…

           आवाहनकर्ता

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689…