Home Maharashtra फुले शाहू चॅरिटेबल ट्रस्टच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी आशिष चेडगे… — मुंबईहून आले...

फुले शाहू चॅरिटेबल ट्रस्टच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी आशिष चेडगे… — मुंबईहून आले पत्र,सरचिटणीस संजीव भांबोरे यांचे सहकार्य…

निलय झोडे

  उपसंपादक

दखल न्यूज भारत

       साकोली : फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन मुंबई महाराष्ट्र, या सामाजिक व राज्यस्तरीय शासकीय नोंदणीकृत ट्रस्टच्या भंडारा जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार आशिष चेडगे यांची आज शनिवार १३ सप्टेंबरला फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हिंगोले मुंबई यांनी ही निवड केली आहे.

         महा.शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष तथा सोशल मिडीयातून गोरगरीबांच्या मुलीस आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आशिष चेडगे यांचे नाव राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सुचविले होते. तसे मुख्यालय भिवंडी मुंबई येथून आज आशिष चेडगे यांना पत्र येत या अग्रेसर ट्रस्टच्या “भंडारा जिल्हा अध्यक्ष” पदावर नियुक्ती करण्यात आले. याबाबत साकोलीसह भंडारा जिल्ह्यातील पत्रकार व सामाजिक क्षेत्रात आशिष चेडगे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

          फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन ही शासनमान्य व महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. यामध्ये या फाऊंडेशन कडून आरोग्य सुविधा, औषधी पुरवठा, अपंगत्व असलेल्या व्यक्तींना कृत्रिम हात पाय, खेळोत्तेजक प्रशिक्षणासाठी ५०% भांडवल, युवा बेरोजगारांना विविध रोजगार उपलब्ध, विधवा, तृतीयपंथींना ५०% भांडवल देत व्यवसाय संधी, गोरगरीब शेतकऱ्यांना कृषी साहित्य अवजारे, औषधी यात १०% भांडवल, चालकांना वाहन खरेदीसाठी ५०% भांडवल व २ लाखांचा अपघात विमा, शासन अनुदानित खेळ, प्रशिक्षण, स्पर्धा करीता ५०% भांडवल, कर्जबाजारी गरीब व्यक्तींना ५०% रक्कम फाऊंडेशनतर्फे देत त्यांना पुन्हा व्यवसायात खंबीर करणे अश्या विविध सेवाकार्य ही राज्यस्तरीय फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन संस्था करीत आहे.

         आज महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी साकोली येथील श्रमिक पत्रकार तथा पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांचे नाव मुंबईला सुचविले. त्यातच त्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारिणी मध्ये “भंडारा जिल्हा अध्यक्ष” या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र आज साकोलीत त्यांना प्राप्त झाले.

         नवनियुक्त अध्यक्ष आशिष चेडगे यांनी सांगितले की, आता कोणत्याही गोरगरीब जनता, विधवा महिला, युवा सुशिक्षित बेरोजगार, दिव्यांग व्यक्ती, गरीब शेतकरी व सामान्य व्यापारींना यापुढे त्रास होणार नाही. सदर फाऊंडेशन सातत्याने भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपले सदस्यगण नोंदणी पूर्ण करीत यांचा प्रत्येक सामान्य जनतेला लाभ दिला जाईल असे सांगितले. 

         साकोली क्षेत्रातील सोशल नेटवर्किंग मिडीयावर नंबर १ असलेले आशिष चेडगे यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय “फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन” च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद, तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनाचे पदाधिकारी व सदस्यगण, व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन कडून आशिष चेडगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.