Home Maharashtra बावडा ते निरा नरसिंहपूर राज्य मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी…. 

बावडा ते निरा नरसिंहपूर राज्य मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी…. 

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        बावडा ते नरसिंहपूर बी के बी एन मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे प्रत्येक वळणावर गतिरोधक टाकण्यात यावा जेणेकरून वाहनाचा वेग कमी होईल. गतिरोधक असल्याने अपघात होणार नाहीत या रस्त्यावर अनेक शाळा, महाविद्यालये तसेच बाजारपेठ परिसर असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका जाणवतो. अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

         लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आसल्यामुळे देवस्थानचा चौफेर सर्वांगीण विकास केलेला आहे.याच विकास निधीतून बी के बी एन राज्य मार्ग 16 किलोमीटर असून याच रस्त्यावर 15 ते 20 जागेवर वळणे आसल्यामुळे गतिरोधक बसवण्यासाठी ग्रामस्तान कडून मागणी होत आहे. तसेच या भागाचे पिढ्यान पिढ्याचे कुलदैवत आहे. अनेक भागातून भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी दररोज हजारोच्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत आसतात.

         बावडा ते नरसिंहपूर या परीसरात राज्य मार्गावर गतिरोधक नसल्यामुळे नागरिकांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावर ठिक ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याच्या मागणीसाठी भावीक भक्त, ग्रामस्थ व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अपघात रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.