बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर तालुका इंदापूर येथे बांधकाम कामगार सेंटर उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील व इतर भागामधील बांधकाम कामगार समाधानी झाले.
अगोदरचे कामगार सेंटर हे निमगाव केतकी या ठिकाणी चालू होते. परंतु या सेंटर वरती अनेक बांधकाम कामगार यांना अनेक गोष्टींच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. यामुळे काही कामगारांकडून वरिष्ठ पातळीवरती तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे बांधकाम कामगार सेंटर शिफ्ट करून तालुक्याच्या ठिकाणी इंदापूर येथे नवीन कामगार नोंदनी व भांडी वाटप सेंटर घेण्यात आले आहे.
या भांडीवाटप सेंटर मध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा बांधकाम कामगारांची लूटमार होत नसुन योग्य प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी कामगार भांडी संच वाटप करण्यात येत आहे.
निमगाव केतकी या ठिकाणी कामगार नोंदणीसाठी व भांडी संच घेण्यासाठी अनेक गोरगरीब कामगार यांना वाहतुकीची सोय नसल्याने स्वतःला आपला लाभ घेता येत नव्हता व कामगारांचीही गैरसोय होत होती. परंतु हे सेंटर इंदापूर या ठिकाणी शिफ्ट केल्याने प्रत्येक कामगारांना कुठल्याही प्रकारची अडचण व गैरसोय होत नाही. त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने आपला लाभ मिळवता येऊ लागला आहे.
इंदापूर येथील बांधकाम सेंटर या ठिकाणी महिला बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षक ठेवण्यात आलेले आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व बसण्याची योग्य सोय केलेली आहे.
भांडी संचांचा तुटवडा आल्याने काही दिवसातच अडचण दुर होईल. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांची नोंदनी आहे.
कामगारानसाठी देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा त्यामध्ये भांडी संच यामध्ये तुटवडा होत आसल्याने कामगारांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
इतर सर्व बांधकाम कामगारांना कोणत्याही प्रकारे त्रास होनार नाही लवकरच भांडी संच व त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न चालु आहेत.
प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांच्या भांडी संचाचा लाभ चार ते पाच दिवसांमध्ये मिळवून देणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले आहे.



