Home Crime नयाकुंड येथे प्रेयसीवर चाकूने केला प्रेमीकाने हल्ला…. — पारशीवनी पोलीस ठाण्यातंर्गत...

नयाकुंड येथे प्रेयसीवर चाकूने केला प्रेमीकाने हल्ला…. — पारशीवनी पोलीस ठाण्यातंर्गत मौजा नयाकुंड येथील घटना.  — मुलगी गंभीर जखमी,उपचारार्थ दवाखान्यात दाखल,आरोपीला तात्काळ अटक.

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पारशिवनी तालुकातंर्गत पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मौजा नयाकुंड येथे वास्तव्यास असलेली कुमारी आशियाना पुरुषोत्तम गजभिये वय २० वीस वर्ष ही नर्स आहे.

       या नर्स मुलीवर गावातील एका तरुणाने आपल्या जवळच्या चाकूने जखमी करून प्राणघात हल्ला गेला केल्याची गंभीर घटना आज सकाळी घडली. 

          घटनाक्रम असा की मौजा नयाकुंड येथे राहत असलेली कुमारी आशियाना पुरुषोत्तम गजभिये वीस वर्ष ही व्यवसायाने नर्स असून पारशिवनी येथील खाजगी रुग्णालयात काम करते.

        आज सोमवार दिनांक ८/९/२५ ला सकाळी १० वाजता च्या दरम्यान ती आपल्या घरासमोर उभी असताना आरोपी संदीप अमरदीप गजभिये वय 27 वर्ष राहणार नयाकुंड या तरुणाने आज सकाळी दहाच्या सुमारास आपल्या जवळच्या चाकूने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात सदर तरुणी गंभीर जखमी झालेली आहे.

       तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.पारशिवनी पोलीसानी पीढीत मुलीच्या बायाना वरून अपराध क्रमांक क्रं.३९६/२०२५ कलम १०९(१) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्ह्याची नोंद घेऊन सांयकाळी आरोपीला शोधुन अटक केली. 

      आरोपी संदीप अमरदीप गजभिये वय 27 वर्ष हा व पीढीता आशियाना पुरुषोत्तम गजभिये वय वीस वर्ष हे दोघेही एकाच गावाचे रहिवासी.तीन वर्षापासून सदर मुलीचे आरोपीशी प्रेमसंबंध होते. 

      पण तो दारूच्या आहारी गेल्यामुळे त्याच्याशी मला प्रेम संबंध ठेवायचे नव्हते.त्यामुळे पोळ्यापासून त्याच्यासोबत मी बोलणे बंद केले.तरी सुद्धा तो मला वारंवार फोन करून भेटण्यासाठी आग्रह करत होता.

        पण मी त्याला भेटत नव्हते,याच रागातून आज सोमवार दिनांक ८/९/२५ सकाळी दहाच्या सुमारास मी माझ्या घराजवळ उभी असताना आरोपी संदीप अमरदीप गजभिये हा जवळ आला व बोलण्याचा प्रयत्न करू लागला.

       तशीच मी घराकडे मागे वडून जात असताना त्याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने माझ्या पार्श भागावर,पोटावर,उजव्या बाजूला,कमरेवर चाकूने वार केले व छातीवर सुद्धा वार केले.माझ्या मानेवर मारणार तेवढ्यात मी त्याचा हात पकडला व आरडाओरड केली असता गावातील लोक व घरचे लोक धावत आले व मला जखमी स्थितीत हॉस्पिटलला घेऊन आले आता माझ्यावर उपचार सुरू आहेत असे पिढीत तरुणीने पोलिसांना बयान देताना सांगितले. 

         पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांचे आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भदाणे पुढील तपास करीत आहे.