ऋग्वेद येवले
उपसंपादक
साकोली : सर्वांचे व विशेष करून चिमुकल्यांचे आवडते लाडके श्री बाप्पांना शहरवासीयांनी अगदी जल्लोषात निरोप दिला. सर्व प्रभागातील गणेशभक्तांमधे आजपासून शांतता व थोडं मन रूसलेले आहे. पण अगदी दोन आठवड्यात पुन्हा साकोली सेंदूरवाफा शहरात “श्री माता राणींचा जयकारा” दुमदुमणार आहे. यावेळी श्री शिवदूर्गा मंदिर सिव्हिल वार्ड वतीने स्थानिक होमगार्ड परेड मैदानावर भव्य दिव्य दांडिया गरबा महोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.
दोन आठवड्यात म्हणजेच सोमवारी २२ सप्टेंबर पासून शहरात श्री नवरात्रीची धूम सुरू होणार आहे. श्री शिवदूर्गा मंदिर सिव्हिल वार्ड वतीने व ए. के रॉयल्स दांडीया ( डॉन्स फॅक्टरी ) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील होमगार्ड परेड मैदानावर भव्य दिव्य दांडिया गरबा महोत्सव सोहळा आयोजित केला जाणार आहे. याची तयारी आतापासूनच मोठ्या उत्साहात केली जात आहे.
होमगार्ड परेड मैदानावर रात्रकालीन भव्य दांडिया गरबा महोत्सवात विशेष आकर्षण म्हणजे प्रेक्षकांना ही स्पर्धा लाईव्ह एल ई डी टिव्ही वर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या भव्य स्क्रीन वर जाहिराती सुद्धा अपेक्षित केल्या आहेत.
सदर होणा-या भव्य दिव्य दांडिया गरबा महोत्सवासाठी गरबा स्पर्धक व चमुंनी अधिक माहितीसाठी आशिष गुप्ता 9284898444 अल्फेज खान 9689261412,अनिकेत कान्हेकर 7058133747, वर संपर्क साधावा असे आवाहनही आयोजकांनी केलेले आहे.



