रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांचा खडसंगी भागामध्ये आज दिनांक 6 सप्टेंबर ला थेट खडसंगी ,रेंगाबोडीआंमडी ,भिवकुंड ,खापरी ,जामनी,बोथली ,गुजगव्हाण ,खुरसापार,सावरी या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी व पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या, सोयाबीनचे पीक पूर्णतः उध्वस्त झाले असून, नदी नाल्याकाठील शेती खरडून निघाली आहे. या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांची परिस्थिती, ई पिक पेरा नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, शासनाची शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी फसवी पीक विमा पद्धती, याबाबतीत शेतकऱ्यांनी आपली तक्रार खासदार महोदयांजवळ व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शासनापर्यंत ह्या सर्व व्यथा पोहोचवू असे आश्वासन दिले जर शेतकऱ्यां प्रति शासन उदासीन राहील तर रस्त्यावर उतरून संघर्ष सुद्धा करू अशी भूमिका घेतली.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील, श्री गजानन रावजी बुटके, विजय पाटील झाडे, राजूभाऊ चौधरी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेशजी चट्टे, युवा नेते संदीप जी कावरे, विनोद जी राऊत व काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना उभाटाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत कोल्हे यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली.खडसंगी ,रेंगाबोडीआंमडी ,भिवकुंड ,खापरी ,जामनी,बोथली,गुजगव्हाण ,खुरसापार,सावली या भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना धीर दिला, शेतकऱ्यांच्या बांधावर प्रथमच या क्षेत्राचे खासदार येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



