रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
जिल्हास्तरीय कनिष्ट गट मैदानी क्रीडा स्पर्धा 2025 वयोगट 14, 16, 18,20, 23 वर्षा आतील मुले मुली स्पर्धा 16 व 17 ऑगस्ट ला जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर आयोगीत स्पर्धेत कठीण अशा स्ट्रिपल चेस व 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यात पियुष संजयराव गायधनी हा प्रथम आलेला आहे .
तरी राज्यस्तरीय स्पर्धा बालेवाडी पुणे येथे होणार आहे पियुष संजयराव गायधनी नेताजी वार्ड चिमुर हा राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविदयालय विसापूर बल्लारशा येथे 1 st year ला शिक्षण घेत आहे. पियुश हा विद्यार्थी शैक्षणिकसह शारिरीक खेळात व व्यायामासंबंधी अतिशय जिद्दी व मेहनती विद्यार्थी आहे. समाजाचे सक्रीय कार्यकर्ते विजय गायधनी याचा पियुष हा पुतण्या आहे.
आपल्या तेली समाजातील विद्यार्थ्याचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टिकोनांतुन श्री संत संताजी जगनाड महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमुर यांच्यावतीने पियुष संजयराव गायधनी यांचा शाल मिठाईने अभिनंदनस्पर तथा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमुरचे अध्यक्ष श्री राजुभाऊ अगडे उपाध्यक्ष श्री भाष्कर बावणकर सचिव ॲड धनराज वंजारी कोषाध्यक्ष प्रभाकर पिसे प्रविण सातपुते ,बालु पिसे , पप्पु धोपटे सदस्यासह विनायक पिसे आदी समाज बांधव उपस्थित होते.



