अबोदनागो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत…
चिखलदरा तालुक्यातील राजदेवबाबा कॅम्प (खोंगडा) येथे वाघाचा हल्ल्यात प्रेम मुन्ना कास्देकर (वय ३० वर्षे, रा. तारुबांदा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.मृतदेह जंगलातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.यानंतर दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेबाबत शासन व संबंधित प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी करण्यात येत आहे.
या प्रसंगी आकाशजी जयस्वाल,गजाननजी भाकरे,मोहन गायन,नकुल खडके,अंकित शिवहरे,दीपक गेठे तसेच परिसरातील नागरिक व तारुबांदा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली!
यशवंत केवलराम काळे..
संयोजक,मेळघाट विधानसभा, भारतीय जनता युवा मोर्चा…






