राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
मौजा बांधगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत शेती शाळा वर्ग 3 रा आज घेण्यात आला.
या शेती शाळा वर्गाला आर.के.राऊत उप.कृषी अ. यांनी प्रत्यक्ष किड – रोग कसे ओळखायचे या विषयी मार्गदर्शन केले.
तसेच जी.के.जल्लेवार यांनी धान पिकावर येणारे किड – रोग विषयी मार्गदर्शन केले व बी. के.कुळसंगे सा.कृषी अ.यांनी कीटक नाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.
या शेती शाळेला किशोर राने सरपंच,ऋषी राने पो.पा.,प्रगतशील शेतकरी जयवंत कापकर,दिलीप चुरागये,ओरासे,मेश्राम सर,गावातील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



